शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कु:हाडला पाणीटंचाईच्या तीव्र झळा

By admin | Updated: March 27, 2017 00:04 IST

प्रचंड गैरसोय : जलाशयांमधील अधिक उपशामुळे उद्भवली समस्या

कु:हाड, ता. पाचोरा : कु:हाड खुर्द  येथे पंधरा दिवसांपासून नळांना पाणी येत नसल्यामुळे गावक:यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे अनुक्रमे वाकडी, म्हसाळा, उमरदे जलाशय  आटल्यामुळे पाण्याची ज्वलंत समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.खूपच दिवसांनी एखाद्या वॉर्डात नळांना पाणी आल्यास गढूळ व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. असे पाणी पिण्यास अयोग्य असते. यामुळे गावात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले व जेष्ठ नागरिकांना जुलाब व अतिसारासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील दवाखाने यामुळे नेहमीच गजबलेले दिसू लागले आहे. पाणी आणण्यासाठी महिलांनासुध्दा दूरवर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच घरांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्याने आजार निर्माण होत आहेत. मात्र ग्रा.प.चे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीस व सरपंचांना या बाबतीत विचारणा केली असता गावपरिसरातील जलाशयातील  पिण्याच्या पाण्याचे आरक्षणाचे  पाटबंधारे खात्याच्या कर्मचा:यांनी केले, मात्र शेतीसाठी ते उपसून टाकल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तरी संबंधितांवर वरिष्ठांनी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी गावक:यांनी केली आहे.कु:हाडसाठी बिल्दी येथील बहुळा धरणातून गावासाठी तत्काळ पाणी योजना लवकर मंजूर करण्यात यावी (ही तर जुनीच मागणी आहे) असे निवेदन प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे. ही योजना मंजूर झाल्यास नेहमीसाठीचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पिण्याच्या पाणाची सोय येत्या आठवडाभरात झाली नाहीतर ग्रामपंचायतीवर महिलांतर्फे हंडा मोर्चा काढण्यात येईल, असे महिलांनी सांगितले.