वीरूभाई, माझा पगार वाढवून द्या, मिश्राने केली होती मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:16 IST2021-04-22T04:16:11+5:302021-04-22T04:16:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क २००८ मध्ये फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये हॅट् ट्रिक घेतली होती. तेव्हा सेहवागने त्याला ...

Virubhai, increase my salary, Mishra had demanded | वीरूभाई, माझा पगार वाढवून द्या, मिश्राने केली होती मागणी

वीरूभाई, माझा पगार वाढवून द्या, मिश्राने केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

२००८ मध्ये फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये

हॅट् ट्रिक घेतली होती. तेव्हा सेहवागने त्याला विचारले होते की, या

बदल्यात तुला काय पाहिजे. तेव्हा त्याने म्हटले होते की, ‘मला मिळणार रक्कम

वाढ‌वून द्या.’

दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. त्यात मिश्राने

मोठा वाटा उचलला होता. त्यानंतर वीरेंद्र सेहवागने जुन्या आठ‌वणींना

उजाळा दिला. २००८ मध्येदेखील त्यावेळच्या दिल्ली डेअरडेविल्सचा गोलंदाज

अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये आपली पहिलीच हॅट्ट्रिक नोंदवली. त्यानंतर

दिल्लीचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने त्याला विचारले की, या बदल्यात तुला

काय पाहिजे. त्यावर मिश्रा म्हणाला होता की, ‘वीरुभाई, माझा पगार वाढवून

द्या.’

अमित मिश्राने शानदार गोलंदाजी करत गेल्यावेळच्या विजेत्या मुंबई

इंडियन्सला १३७ धावांतच रोखले. त्यानंतर रिषभ पंतच्या संघाने शानदार

फलंदाजी करत मुंबईवर सहज विजय मिळवला. या विजयानंतर सेहवागने आपल्या खास

शैलीत हा किस्सा सर्वांसमोर आणला. या सामन्यातही मिश्रा याने २४ धावा देत

४ बळी मिळवले. त्या जोरावरच दिल्लीचा विजय साकारता आला.

Web Title: Virubhai, increase my salary, Mishra had demanded