शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दाम दुप्पट करून देण्याचे सांगत विरारच्या महिलेला साडेसात लाखाचा गंडा

By admin | Updated: June 14, 2017 13:07 IST

एका महिलेला साडे सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - जादू टोणाच्या माध्यमातून दाम दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून भडगावच्या दोन जणांनी विरार (जि.पालघर) येथील एका महिलेला साडे सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. रज्जाक वजीर तडवी (वय 41) व गोपी मल्लु गौड (वय 60) दोन्ही रा.रा.यशवंत नगर, भडगाव या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 45 हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.जादू टोणा करुन दिलेली रक्कम दुप्पट करुन देतो असे आमिष या दोघांनी विरार येथील एका महिलेला दाखविले होते. त्यानुसार या महिलेकडून साडे सात लाख रुपयांची रोकड घेवून आम्ही स्मशानभूमीत जावून तेथील राखेच्या माध्यमातून ही रक्कम दुप्पट करतो, तुम्ही मागे या असे सांगून या दोघांनी 10 जून रोजी कारमध्ये बसून पलायन केले होते. रक्कम घेवून गेलेले बाबा परतलेच नाहीत, त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने विरार पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर गंडा घालणारे रज्जाक तडवी व गोपी गौड हे भडगाव येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तेथील पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी मंगळवारी एक पथक संशयितांच्या शोधासाठी पाठविले होते. या पथकाने दोघांना बसस्थानक परिसरातच घेरले. दोघांजवळून 1 लाख 45 हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली. दरम्यान, खामगाव येथील मौलानाच्या सांगण्यावरुन आम्ही विरार येथे गेलो होतो असे त्यांनी चौकशीत सांगितले. दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या मौलानालाही आरोपी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.