विजय चव्हाणचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:06+5:302021-07-01T04:13:06+5:30

गेल्या आठवड्यात रात्री साडेनऊच्या सुमारास हावडा एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महिलेचा पाय अचानक घसरला. ती महिला ट्रेनच्या पायऱ्या ...

Vijay Chavan felicitated by the Guardian Minister | विजय चव्हाणचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

विजय चव्हाणचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

गेल्या आठवड्यात रात्री साडेनऊच्या सुमारास हावडा एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महिलेचा पाय अचानक घसरला. ती महिला ट्रेनच्या पायऱ्या आणि फलाट यांच्यातील मोकळ्या जागेत पडली. काही क्षणात ट्रेनच्या चाकात येऊन मरण्याची शक्यता होती. याप्रसंगी त्या प्लॅटफाॅर्मवर असणारे दादर पोलीस स्थानकातील कर्मचारी विजय रमेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला बाहेर खेचले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. विजय चव्हाण यांचे हे शौर्य कौतुकाचा विषय बनले असून, सोशल मीडियात त्यांच्या या बचाव कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या या शौर्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मिळताच त्यांनी आज मंत्रालयात विजय चव्हाण यांचा सत्कार केला.

याप्रसंगी पोलीस फौजदार रवींद्र धुळे, सहायक पोलीस फौजदार राजेंद्र गुरव, खासगी सचिव अशोक पाटील, ओ. एस. डी. बडे, स्वीय सहायक गोविंद पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Vijay Chavan felicitated by the Guardian Minister