शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूने घेतला शहरात बळी

By admin | Updated: January 28, 2015 13:49 IST

दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये धुमाकूळ घालणारा स्वाईन फ्लू काही महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा जळगाव शहरात दाखल झाला असून त्याने या वर्षात पहिला बळी घेतला आहे.

जळगाव : दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये धुमाकूळ घालणारा स्वाईन फ्लू काही महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा जळगाव शहरात दाखल झाला असून त्याने या वर्षात पहिला बळी घेतला आहे. शहरातील चैत्रबन कॉलनीतील श्रीकांत मदनराव विधाते(५४) यांचा स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मुंबईतील महानगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात २३ जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.विधाते व्यावसायिक असून त्या निमित्ताने मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये त्यांची ये-जा होती. या शहरांमध्ये स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान विधाते स्वाईन फ्लूच्या रुग्णाच्या संपर्कात आले. सर्दी, खोकला आणि ताप आदी लक्षणे असल्याने ते १६ जानेवारी रोजी डॉ.सुनीलदत्त चौधरी यांच्या रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र १९ जानेवारीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्यांना गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर २२ जानेवारीपर्यंत उपचार करण्यात आले. मात्र सुधारणा झाली नाही. गणपती हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यांचे रिपोर्ट प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यानंतर २३ जानेवारी रोजी विधाते यांना एअर अँम्बुलन्सने मुंबई येथे पाठविण्यात आले. तेथे मनपाच्या कस्तुरबा रुग्णालयात १.४५ मिनिटांनी स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी ५.४0 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.विधाते यांचे प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्याच्या अहवालानुसार विधाते यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके यांनी दिली. त्यांना कस्तुरबा गांधी रुग्णालयाकडून मंगळवारी माहिती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूने रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातर्फे खबरदारी घेण्यात येत असून उपाय योजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

----------

वराह पालन करणार्‍यांना सात दिवसांचा अल्टीमेटम नियमबाह्यपणे वराहपालन करणार्‍या नागरिकांना मनपा आरोग्य विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली असून हे वराह ७ दिवसांच्या आत शहराबाहेर हलविण्याचे आदेश दिले आहेत. या वराहांमुळे नागरिकांच्या आरोग्यास उपद्रव होत असून नागरिकांनी लावलेल्या वृक्षांचे सुद्धा नुकसान होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. मनपा अधिनियम १९४९ मधील कलम ३३६(२) नुसार बेकायदा वराह पालन करणे गुन्हा आहे. मनपा ती जनावरे ताब्यात घेईल असा इशारा दिला आहे. कुटुंबीयांचेही घेतले नमुने; आरोग्य विभाग सतर्क स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे काळजी घेतली जात आहे. विधाते यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या १0 जणांच्या पथकाने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात जणांचे नमुने घेतले आहेत. चैत्रबन कॉलनीची लोकसंख्या ४ हजार ४६५ असून त्यापैकी १ हजार ११८ कुटुंबांना आरोग्य विभागाच्या पथकाने भेटी दिल्या आहेत. या कॉलनीतील नागरिकांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. सहा नागरिकांना ताप, सर्दी व खोकला असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.