प्रेमाच्या ‘गुलाबी’ प्रतीकाने होणार ‘व्हॅलेंटाईन वीक’ ची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:37+5:302021-02-05T05:57:37+5:30

जळगाव : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ ची. जो आता ...

Valentine's Week begins with a 'pink' symbol of love | प्रेमाच्या ‘गुलाबी’ प्रतीकाने होणार ‘व्हॅलेंटाईन वीक’ ची सुरुवात

प्रेमाच्या ‘गुलाबी’ प्रतीकाने होणार ‘व्हॅलेंटाईन वीक’ ची सुरुवात

जळगाव : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ ची. जो आता काही दिवसांवरच येऊन ठेपलाय. पण, या ‘व्हॅलेंटाईन डे’ ची सुरुवात एक आठवडाआधीच होते. ज्यात वेगवेगळ्या दिवसांचा समावेश असतो. रविवारी ‘रोझ डे’ ने या ‘व्हॅलेंटाईन वीक’ ला सुरूवात होणार आहे.

व्हॅलेंटाईन सप्ताहामधील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्व आहे़ या सप्ताहात लोक प्रिय व्यक्तीला गुलाब, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे शहरातील गिफ्ट गॅलरींमध्ये विविध व्हरायटीच्या भेटवस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. फूल विक्रेत्यांकडेही देशभरातील विविध प्रकारातील गुलाबाची फुले विक्रीला आली आहेत. ७ फेब्रुवारीला प्रेमाचे आणि मैत्रीचं नाते जोडण्यासाठी या दिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात.

व्हॅलेंटाईन डे चा इतिहास

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा इतिहासही फारच रोमांचक आहे. तिसऱ्या शतकात रोममध्ये एक क्लॉडिअस नावाचा राजा होता. हा राजा फारच कठोर होता. त्याचं मत होतं प्रेम आणि लग्न हे मनुष्याला कमजोर करतात. त्याने त्याच्या सैनिकांना लग्न आणि प्रेम न करण्याचा आदेश दिला होता. क्लॉडिअसच्या राज्यात एक संत होते. त्यांचं नाव होतं व्हॅलेंटाईन. त्यांनी राजाच्या आदेशाला न जुमानता प्रेमाचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरुवात केली. इतकेच काय तर काही सैनिकांचं लग्नही करून दिलं. जेव्हा राजाला याची माहिती मिळाली तेव्हा राजाने संत व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा दिली. १४ फेब्रुवारीला त्यांना फाशी देण्यात आली होती. तेव्हापासून हा दिवस प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातोय.

व्हॅलेंटाईन डे वीक

७ फेब्रुवारी - रोज डे

८ फेब्रुवारी - प्रपोज डे

९ फेब्रुवारी - चॉकलेट डे

१० फेब्रुवारी - टेडी डे

११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे

१२ फेब्रुवारी - हग डे

१३ फेब्रुवारी - किस डे

१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे

Web Title: Valentine's Week begins with a 'pink' symbol of love