शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यात ५६ हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

भुसावळ : जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळ शहरातील लोकसंख्येच्या मानाने पाहिजे तितका कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा उपलब्ध होत नाही, ...

भुसावळ : जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळ शहरातील लोकसंख्येच्या मानाने पाहिजे तितका कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा उपलब्ध होत नाही, लोकसंख्येच्या तुलनेत जास्तीचा लसीचा साठा उपलब्ध व्हावा जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. याशिवाय आलेल्या लसी हे प्रत्येक केंद्रावर समसमान वाटल्या गेल्यास केंद्रावर गर्दी होणार नाही. असे नियोजन झाल्यास कोरोनाचा धोकाही कमी होईल. आजपर्यंत शहरी भागात पहिला व दुसरा डोस ४५ हजार ३९९, तर ग्रामीण भागात ११ हजार ४३ नागरिकांनी घेतला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण कमी झाले आहे.

कोरोनाची दुसरी लाट भयावह ठरत आहे. यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले याची धास्ती घेत सुरुवातीला या लसीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी नंतर लसीकरण केंद्रावर रांगा लावल्या. लस आल्यानंतर अवघ्या काही तासातच केंद्रावरून लसींचा साठा संपून जात आहे. इतकी धास्ती सध्या नागरिकांनी घेतल्याचे दिसून येत आहे

पहाटे पाचपासून लागतात रांगा

कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी लस हेच एकमेव शस्त्र आहे, याकडे आता नागरिक गांभीर्याने विचार करून लस घेण्यासाठी वाढताना दिसत आहेत. शहरातील सर्व केंद्रांवर पहाटे पाचपासून नागरिकांच्या रांगा लागताना दिसत आहेत.

असे झाले लसीकरण

शहरी भागात आजपर्यंत पहिला डोस ३० हजार ७०६, तर दुसरा डोस ११ हजार ६९३ नागरिकांनी घेतला. एकूण ४५ हजार ३९९ नागरिकांनी पहिला डोस व दुसरा डोस घेतला आहे.

ग्रामीण भागात ८ हजार ९०४ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, २ हजार १३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण ११ हजार ४३ नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे. शहर व ग्रामीण भागाचे पहिला व दुसरा डोस मिळून आजपर्यंत ५६ हजार ४४२ नागरिकांनी लस घेतली आहे.

एमडी वैद्यकीय अधिकारी असावे

लोकसंख्येच्या मानाने व जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळ शहराची मदार बीएएमएस डॉक्टरवर आहे. घरातील एखाद्या व्यक्तीला काही व्याधी झाल्यास कोणीही एमडी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी वळत असतो; मात्र भुसावळसारख्या शहरात पालिका रुग्णालयात एमडी डॉक्टर नसल्याची शोकांतिका आहे. याठिकाणी नगरपालिका रुग्णालयात एमडी डॉक्टरची नियुक्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यावर पडतो ताण

पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांच्यासह कमी स्टाफ असल्यामुळे सर्वच कामे तोकड्या स्टाफवरच अवलंबून असतात. हा ताण कमी करण्यासाठी येथे एमडी डॉक्टरांसह इतर नर्सिंग स्टाफचीही नेमणूक झाल्यास नक्कीच सद्य:स्थितीत असलेल्या स्टाफवरचा ताण कमी होईल. एरव्ही डॉ.फलटणकर या सतत कामात व्यस्त असतात.