शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

मूर्ती भंगल्याने जळगावात 2 तास तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 12:24 IST

रिक्षा व दुचाकीची तोडफोड : आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल; पाच जणांना घेतले ताब्यात

ठळक मुद्देदुस:या मूर्तीची विधीवत स्थापनाबैठक सुरु असताना भिरकावले दगडगणरायाची मूर्ती जमिनीवर कोसळली व भंगली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 - गणेश मंडळाच्या मंडपाला रिक्षाचा धक्का लागून मूर्ती जमिनीवर कोसळून भंगल्याने शहरातील वाल्मिक नगरातील कोळी पेठेत गुरुवारी दुपारी तीन वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. यावेळी दगडफेक झाल्याने पळापळ झाली. संतप्त नागरिकांनी रिक्षाची काच फोडून दुचाकीचीही तोडफोड करुन नाल्यात फेकली.  दोन तासाच्या तणावानंतर आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिका:यांच्या उपस्थितीत विधीवत आरती करुन सायंकाळी मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. दोन तासाच्या अथक प्रय}ानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले. अन् वादाची ठिणगी पडलीरिक्षाचा धक्का लागल्याने मूर्ती जमिनीवर कोसळल्याने मंडळाच्या कार्यकत्र्यानी रिक्षा चालकाला जाब विचारला असता सात ते आठ जणांनी या कार्यकत्र्याशी वाद घातला व एकमेकाच्या अंगावर धावून गेले. याचेवळी काही घरातून दगडफेक झाल्याने वाद वाढला.मंडळाच्या पदाधिका:यांसह रहिवाशांना समजूत घालण्यासाठी एका मोकळ्या जागेत एकत्र आणण्यात आले.आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व उपअधीक्षक सचिन सांगळे हे या घटनेला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात येईल असे आश्वासन देऊन शांततेचे आवाहन करीत असतानाच त्या ठिकाणी कोणीतरी दगड भिरकावला, त्यामुळे रहिवाशी आणखी संतप्त झाले.  पोलिसांनी  दगड फेकणा:यांचा शोध घेतला, मात्र कोणीही हाती लागले नाही.सांगळेंची भूमिका निर्णायक दोन तासापासून समजूत घातल्यानंतरही तणाव कमी होत नसल्याने पाहून उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्वाना एकत्रित करुन ‘तुम्ही जशी फिर्याद द्याल,त्याप्रमाणे गुन्हा दाखल करु. दोषी असलेल्या चार जणांना अटकही करण्यात आल्याचे सांगितल्याने तणाव निवळला.रहिवाशांच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने तातडीने गणरायाची दुसरी मूर्ती मागविली, मात्र मंडळाचे पदाधिकारी व रहिवाशांनी ही मूर्ती स्थापन करण्यास विरोध दर्शविला. शेवटी जिल्हाधिकारी, आमदार,पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, महामंडळाच्या पदाधिका:यांनी कार्यकत्र्याशी पुन्हा एकत्रित चर्चा केली. सातवा दिवस असल्याने आधीच्या मूर्तीचे विसजर्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपाचे ट्रॅक्टर मागविण्यात आले. सायंकाळी 5.15 वाजता सर्वाच्याच उपस्थितीत आरती करुन मूर्ती विसर्जनासाठी मेहरुण तलावावर नेण्यात आली. नंतर दुस:या मूर्तीची विधीवत स्थापना झाली.वाल्मिक नगरातील झुंजार बहुद्देशीय मंडळातर्फे कोळी पेठेत गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. संमिश्र वस्ती असली तरी या ठिकाणी  सर्वच उत्सव गुण्यागोविंदाने साजरे होत असतात.  गुरुवारी दुपारी तीन वाजता शेख अजमोद्दीन गुलाम हुसेन (वय 45 रा.मन्यारवाडा, कोळी पेठ, जळगाव) हा त्याची रिक्षा (क्र.एम.एच.19 व्ही.9743) घेऊन घराकडे जात असताना रिक्षाच्या मागील टायरचा गणेश मंडळाच्या मंडपाला धक्का लागला व त्यामुळे गणरायाची मूर्ती जमिनीवर कोसळली व भंगली.