शहरातून दोन दुचाकी लांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST2021-08-27T04:20:28+5:302021-08-27T04:20:28+5:30

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट व नवीन बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या ...

Two bikes pulled out of town | शहरातून दोन दुचाकी लांबविल्या

शहरातून दोन दुचाकी लांबविल्या

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट व नवीन बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर व जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्राळ्यातील मयूर कॉलनी येथील रहिवासी रामकृष्ण नारायण महाजन हे २३ रोजी सकाळी नवीन बसस्थानकावर दुचाकीने (क्र. एमएच १९ एजे ६४६२) आले होते. नंतर आवारात दुचाकी उभी करून ते कामानिमित्त निघून गेले. रात्री ११ वाजता दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी परतल्यानंतर त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे आढळून आले. याच दिवशी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वंजारी बुद्रुक येथील राहुल सुरेश सोनवणे यांनी गोलाणी मार्केट आवारातील दत्तमंदिराजवळ उभी केलेली दुचाकीसुद्धा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two bikes pulled out of town