भुसावळ रेल्वे स्थानकावर सापडलेले अडीच लाखांचे बेवारस सोने

By Admin | Updated: June 15, 2017 17:33 IST2017-06-15T17:33:22+5:302017-06-15T17:33:22+5:30

याबाबत लोहमार्ग पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळली आह़े

Two-and-a-half lakhs worthless gold found at Bhusawal railway station | भुसावळ रेल्वे स्थानकावर सापडलेले अडीच लाखांचे बेवारस सोने

भुसावळ रेल्वे स्थानकावर सापडलेले अडीच लाखांचे बेवारस सोने

ऑनलाईन लोकमत / गणेश वाघ

भुसावळ, जि. जळगाव, दि. 15 - हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या भुसावळ रेल्वे स्थानकावर तब्बल अडीच लाख रुपये किंमतीचे बेवारस सोने लोहमार्ग पोलिसांना सापडले आहेत़ गुरुवारी दुपारी ही घटना घडली असली तरी याबाबत लोहमार्ग पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळली आह़े
दरम्यान, हे सोने चोरीचे की काळ्य़ाबाजारातील? यासह विविध तर्क-वितर्काना उधाण आले आहे
शहरातील रेल्वे स्थानकावर दिवसभर हजारो प्रवाशांची वर्दळ सुरू असतानाच गुरुवारी दुपारी गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांना प्लॅटफार्मवर एक काळ्या रंगाची बॅग आढळल्याने पोलिसांनी ती जप्त करीत तिची तपासणी केली असता त्यात तब्बल 80 ग्रॅम वजनाचे व सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे सोने आढळल्याने पोलीसही अवाक झाल़े
तक्रारदाराचा लागला शोध
सुरुवातीला हे सोने चोरीचे असल्याचा संशय व्यक्त होत असताना पोलिसांनी तपासचक्रे फिरवून हे सोने ठाणे येथील महिलेचे असल्याचे सांगितल़े तक्रारदार भुसावळात आल्यानंतर सोन्याची नेमकी चोरी कशी व कुठून झाली याचा उलगडा होणार आह़े लोहमार्ग पोलिसांकडून जप्त केलेल्या सोन्याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े

Web Title: Two-and-a-half lakhs worthless gold found at Bhusawal railway station