मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर पाटचारीत उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:20+5:302021-02-05T05:57:20+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भादली येथील पीतांबर रामकृष्ण ढाके यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू आहे. सुरेश तुळशीराम कोळी यांच्या ...

Tractors carrying laborers overturned in Patchari | मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर पाटचारीत उलटले

मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर पाटचारीत उलटले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भादली येथील पीतांबर रामकृष्ण ढाके यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू आहे. सुरेश तुळशीराम कोळी यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमधून (क्र.एमएच १९- डीजी८२६६) मजुरांना ने-आण केली जात होती. सोमवारी कापूस वेचणी झाल्यानंतर ट्रॅक्टर महिलांना सोडण्यासाठी भादली गावाकडे पाटचारीवरून जात असताना जळगाव-भादली फाट्यावर अचानकपणे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यात ट्रॉलीसह ट्रॅक्टर पाटचारीत उलटले. यात ट्रॅक्टरमधील हिरकणी हिरामण सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या जागीच ठार झाल्या. तर या रूपाली कोळी (वय ३२), अनिता कोल्हे (वय ३२), चंद्रकला पाटील (वय ५६), जिजाबाई कोळी (वय ४०), चेतना कोळी (वय ४०), पूजा कोळी (वय ३०), अनुप भिल (वय ३५), ममता कोळी (वय ३०), पूनम कोळी (वय ३२), वंदना कोळी (वय ३५), अरुणा भिल (वय ४०) या ११ महिला जखमी व पंकज कोळी (वय २०) हा तरुण जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील राधिका ढाके यांनी कोतवाल चुन्नीलाल कोळी यांच्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर नशिराबाद पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानुसार नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, राजीव साळुंखे, प्रवीण ढाके, अलीयार खान हे सुध्दा घटनास्थळ पोहचले. रुग्णवाहिकेतून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. हिरकणीबाई यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Tractors carrying laborers overturned in Patchari