शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आजपासून कानिफनाथ यांचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 4:18 PM

धार्मिक : अजनाडला आज तर खानापूर, निरूळ व अहिरवाडीत उद्या विविध कार्यक्रम

रावेर : तालुक्यातील खानापूर, निरूळ व अहिरवाडी येथील श्री कन्हैयालाल महाराज देवस्थान मंदिरात निमाड व खान्देश प्रांतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कानिफनाथांचा यात्रोत्सव माघ शुद्ध प्रतिपदेच्या औचित्यानेउत्साहात साजरा केला जात आहे. अजनाडला २४ रोजी तर खानापूर, निरुळ व अहिरवाडीत २५ रोजी यात्रोत्सव साजरा होत आहे.अख्यायिकाखानापूर येथील परशुराम भगत हे आपल्या बाराबलुतेदारीतील सुतारीच्या व्यवसायानिमित्त निरूळ येथे जात असत. काम हीच आपली पुजा मानणाऱ्या परशुराम भगत यांना अकस्मात श्री कानिफनाथांचा साक्षात्कार झाला. त्यांनी थेट अहमदनगर जिल्ह्यातील पंचमढी येथील श्री कानिफनाथांच्या समाधीस्थळी जावून कसोटी पणाला लावली. सदर संस्थानतर्फे त्याना एक टोप व सिंहासन (गादी) प्रदान करण्यात आले होते. परशुराम महाराज यांची कर्मभूमी निरुळ असून जन्मभूमी असलेल्या खानापूर येथे श्री कानिफनाथांच्या सिंहासनाची स्थापना करून पौष वद्य अमावस्या, माघ शुद्ध प्रतिपदा व धर्मबीजेनिमीत्त या तीनही गावात यात्रामहोत्सवाची धर्मपताका फडकवली आहे. सदर यात्रा महोत्सवास सुमारे २०० ते २५० वर्षांची परंपरा लाभली आहे. तालूूक्यातील खानापूर, निरूळ व अहिरवाडी येथील श्री कानिफनाथ महाराज देवस्थानचे ५१ फुट काठी तथा ध्वजस्तंभ व सिंहासमावरील दैवत पौष वद्य अमावस्येनिमीत्त २४ जानेवारी रोजी तापी , खडखडी व नागोई नदीचा त्रिवेणी संगमावर असलेल्या अजनाड येथे सवाद्य मिरवणूकीतून पालखीसह नेले जात असल्याने २४ फेब्रुवारी रोजी अजनाड येथे यात्रोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, अजनाड गावात घरोघरी भगतांच्या हातातील छडीचे सुवासिनी सुपूजन करून सहकुटुंबआशिर्वाद घेतात.२५ जानेवारी रोजी खानापूर येथील यात्रा महोत्सवात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ग्रामवासीयांसह खान्देश व मध्यप्रदेशातील निमाड येथील भाविक दर्शनार्थ एकच गर्दी करीत असतात. दरम्यान, उभय ग्रामस्थ दोन ट्रॉली भरून आणलेल्या शेणाच्या गोवऱ्यांच्या वणव्यात ग्रामस्थांनी जमा केलेल्या गव्हाच्या पाणगेस्वरूप बाटी सामुहिक श्रमदानातून भाजतात. तद्वतच मिश्र डाळीचे २१ हंडे वरण असलेला रिध्दीसिध्दीयुक्त महाप्रसाद तयार करतात.दुपारी संस्थानतर्फै व ब्रम्हलीन भगतवृंदाच्या बसथांब्यावरील समाधी अर्थात तुर्बतस्थळाला भावांजली वाहण्याची व मान फेडण्याची परंपरा जोपासली जाते. सायंकाळी भगतवृंदाची सवाद्य शोभायात्रा बसस्थानकावरील समाधीस्थळी नेली जाते.दरम्यान, गावाला वाद्यांच्या गजरात नगरप्रदक्षिणा घालून भगतवृंद श्री कन्हैयालाल महाराज मंदिरासमोर पोहोचल्यानंतर, आकाशात नववस्त्रांच्या चिंध्यांनी गोडेतेलात भिजवलेले गेंदांच्या अग्नीप्रदीपन केलेल्या माळांखाली भगतवृंद नृत्य सादर करतात. रात्री उशिरा यात्रा महोत्सवात लोटणाºया यजमानांसह सर्व ग्रामस्थ रिध्दीसिध्दीयुक्त प्रसादाचा लाभ घेतात.