बलात्कारातील आरोपींवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST2021-09-26T04:19:43+5:302021-09-26T04:19:43+5:30

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जळगाव : जिल्ह्यात सुरुवातीला जून व जुलै महिन्यात कमी पाऊस झाला तर आता शेवटी ...

Take action against the accused of rape | बलात्कारातील आरोपींवर कारवाई करा

बलात्कारातील आरोपींवर कारवाई करा

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

जळगाव : जिल्ह्यात सुरुवातीला जून व जुलै महिन्यात कमी पाऊस झाला तर आता शेवटी जास्त पाऊस होत आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा किसान कॉंग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली. या विषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यावर जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव एकनाथ गायकवाड, अमळनेर तालुका अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील आदींच्या सह्या आहेत.

पंडित दीनदयाळ यांना अभिवादन

जळगाव : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी अभिवादन करण्यात आले. याप्रंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार जितेंद्र कुंवर, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

Web Title: Take action against the accused of rape