शिरसोलीच्या जंगलात म्हसावदच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: June 12, 2017 17:30 IST2017-06-12T17:30:35+5:302017-06-12T17:30:35+5:30

कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह : दारु पाडण्यासाठी गेला अन् गायब झाला

Suspected death of a youth of Mhasawadi in Shirsoli forest | शिरसोलीच्या जंगलात म्हसावदच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

शिरसोलीच्या जंगलात म्हसावदच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

ऑनलाईन लोकमत

जळगाव/शिरसोली,दि.12 - तालुक्यातील शिरसोली येथील जंगलात शामा फायर कंपनी शेजारील भागात ताराचंद जंगलु भील (वय 35 रा.म्हसावद,ता.जळगाव) या तरुणाचा सोमवारी सकाळी अकरा वाजता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर तसेच अंगावर जखमा आढळून आल्याने त्याच्या मृत्यूविषयी शंका निर्माण होत आहे. दरम्यान, मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे.
ताराचंद हा गेल्या काही दिवसापासून शिरसोली येथील जंगलात बुदलीबर्डी टेकडीजवळ एका झोपडीत प}ी आक्काबाई व तीन लहान मुलींसह राहत होता. या टेकडीलाच लागून एक धरणही आहे. शिरसोली येथील सासरवाडी असल्याने गावातील तीन तरुण त्याला गुरुवारी दारु पाडण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर तो घरीच आला नव्हता. सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एका गुराख्याला शामा फायर कंपनीच्या मागे अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानुसार याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

Web Title: Suspected death of a youth of Mhasawadi in Shirsoli forest