सुनील झंवर, जैन यांचे कार्यालय उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:22+5:302021-02-05T05:57:22+5:30

जळगाव : सुनील झंवर याचे खान्देश मिल व्यापारी संकुलातील रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे दोन गाळे, साई मार्केटिंग, महावीर जैन ...

Sunil Zanwar, Jain's office opened | सुनील झंवर, जैन यांचे कार्यालय उघडले

सुनील झंवर, जैन यांचे कार्यालय उघडले

जळगाव : सुनील झंवर याचे खान्देश मिल व्यापारी संकुलातील रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे दोन गाळे, साई मार्केटिंग, महावीर जैन याचे आरटीओ कार्यालयाशेजारील इमारतीतील कार्यालय, विवेक ठाकरे याचे गोलाणी मार्केटमधील कार्यालय व धरम सांखला याचे बी.जे. मार्केटमधील कार्यालय उघडण्यात आले आहे.

रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे कार्यालयाचे सील उघडण्यात यावे यासाठी सुनील झंवर याचा मुलगा सूरज याने पुणे न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने कार्यालयाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग तसेच संगणक व इतर तांत्रिक माहितीच्या प्रती तयार करून कार्यालयाचे सील उघडण्याचे आदेश न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले होते.

डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला धरम साखला, सुजित वाणी व विवेक ठाकरे या तिघांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर २७ जानेवारी रोजी निर्णय होणार आहे. महावीर जैन याचा जामीन अर्ज याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

Web Title: Sunil Zanwar, Jain's office opened