शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रंगतरंग महोत्सवात विद्यार्थ्यांचा ‘कलाविष्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या रंगतरंग अंतर्गत कला महोत्सवाला सोमवारी विविध कला स्पर्धा आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या रंगतरंग अंतर्गत कला महोत्सवाला सोमवारी विविध कला स्पर्धा आणि प्रदर्शनाने थाटात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी चित्रकला, प्रतिकृती बनवणे, रांगोळी, नाट्यछटा तसेच सुगम गायन, एकल नृत्यातून आपला कलाविष्कार सादर केला. त्यामुळे महोत्सवात रंगत आली होती. दुसरीकडे विविध साकारलेल्या रांगाळ्यांमूधन बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने रंगतरंग कला महोत्सव हा वर्गांमध्ये घेण्यात आला. यात सुरूवातीला चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा प्रत्यक्ष स्वरूपात पार पडल्या. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केले. चित्रकला स्पर्धेमध्ये ‘माझ्या स्वप्नातील आधुनिक भारत तसेच कोरोना योद्धा’ या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटन करत आपलं कल्पनाविश्व साकारले. तर रांगोळी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाओ तसेच पर्यावरण वाचवा’ संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी साकारले स्वप्नातील घर

इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी छायाचित्र स्पर्धेमध्ये परिसरातील सौंदर्य तसेच पक्षी निरीक्षण या विषयावर बोलकी चित्र रेखाटल्याचे बघायला मिळाले. त्याचबरोबर प्रतिकृती बनविण्याच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी काही ऐतिहासिक वास्तूसह स्वप्नातील घराची प्रतिकृती पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करीत साकारले होते. यात गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीसह अनेकांनी आपली स्वप्नातली घर तयार केली़ याशिवाय इयत्ता पहिली ते आठवीसाठी चित्रकला, प्रतिकृती बनवणे, रांगोळी, नाट्यछटा, छायाचित्र, सुगम गायन, वक्तृत्व आणि एकल नृत्य या स्पर्धा घेण्यात आल्या. तर चित्रकला आणि मॉडेल मेकिंगचे प्रदर्शन कला दालनात भरविण्यात आले. मंगळवारी विविध विषयांवर नाट्यछटा, देशभक्ती गीत, धार्मिक गीत, नृत्य, वकृत्व आदीं स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर स्पर्धा संपल्या नंतर यशस्वी विद्यार्थ्यांची नावे घोषित केली जातील तसेच पहिली ते आठवीच्या विजयी विद्यार्थ्यांना आणि सहभागी विद्यार्थ्यांना ई -प्रमाणपत्र दिली जाणार आहेत.

यांनी घेतले परिश्रम

शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील तसेच माध्यमिक विभागाचे समन्वयक गणेश लोखंडे प्राथमिक विभागाच्या समन्वयिका रत्नमाला पाटील यांच्या मार्गदर्शनात कला महोत्सवाचे माध्यमिक विभागाचे प्रमुख प्रदीप वाघ आणि क्षमा पाटील आणि प्राथमिक विभागाचे प्रमुख जयश्री पाटील तसेच मंजुषा साळुंखे यांच्यासह सर्व कलाशिक्षक तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.