पोलीस कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:16 IST2021-03-05T04:16:23+5:302021-03-05T04:16:23+5:30

जळगाव : दुचाकीचा काच तोडल्याच्या कारणावरून पोलीस मुख्यालयाचा कर्मचारी नटवर जाधव यांनी किरण संजय चौधरी (२७, रा.दादावाडी) या विद्यार्थ्याला ...

Student beaten by police officer | पोलीस कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

पोलीस कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

जळगाव : दुचाकीचा काच तोडल्याच्या कारणावरून पोलीस मुख्यालयाचा कर्मचारी नटवर जाधव यांनी किरण संजय चौधरी (२७, रा.दादावाडी) या विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दोन वाजता शाहू नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे तपास करीत आहेत.

वीजतारांच्या स्पर्शाने शेतातील दादर जळून खाक

जळगाव : शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीजतारांचा स्पर्श झाल्याने शेतातील ४० हजार रुपये किमतीचे दादरचे पीक जळून खाक झाल्याची घटना नशिराबाद शिवारात २ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता घडली. शेतमालक कोकिळा निवृत्ती नेहते (४९, रा. नशिराबाद) यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अकस्मात आगीची नोंद झाली आहे.

निवृत्त पोलिसाचा मोबाइल लांबविला

जळगाव : बहिणाबाई उद्यानानजीकच्या भाजी बाजारातून सेवानिवृत्त पोलीस अंमलदार प्रकाश रामा निंबाळकर (५९, रा.अथर्व कॉलनी) यांचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Student beaten by police officer