शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

काढलेल्या गतिरोधकामुळे खड्डयांमध्ये भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 12:47 IST

असून अडचण नसून खोळंबा : कर भरणाऱ्या नागरिकांच्या नशिबी खडड््यांचा फेरा सुटता सुटेना

जळगाव : शहरातील ८५० अनधिकृत गतिरोधक तोडायला मनपाने गेल्या महिन्यापासून सुरुवात केली आहे. गतीरोधक मुक्त शहर करायला गेलेल्या महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची प्रचिती जळगावकरांना येत आहे. मनपाकडून गतीरोधक काढल्यानंतर त्या ठिकाणचा रस्ता समतल केला जात नसल्याने आता गतीरोधकाच्या ठिकाणी भलेमोठे खड्डे तयार होत असल्याने गतिरोधकांची समस्या ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.महापालिकेकडून शहरातील रस्त्यांवर उभारण्यात आलेले सर्व गतिरोधक हे अनधिकृत असून, याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने शहरातील सर्व गतिरोधक काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपाकडून १६ आॅक्टोबरपासून शहरातील सर्व ८५० गतीरोधक काढायला सुरुवात झाली. अजूनही ही मोहीम सुरुच असून, काही भागातील गतीरोधक काढण्यात आले आहेत. तर काही ठिकाणचे गतीरोधक अद्याप कायम आहेत. अनेक ठिकाणी मनपाकडून गतीरोधक काढताना रस्ता खरडला जात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आधी गतीरोधक होते अशा ठिकाणी आता खड्डे तयार झाले आहेत. शहरात आधीच रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत, अशा परिस्थितीत गतिरोधक काढण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने वाहनधारकांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहेत.गतीरोधक काढण्याचे आदेश देवून अधिकारी रजेवरमनपा प्रशासनाने गतीरोधक काढण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवस गतीरोधक काढण्याचे काम व्यवस्थित सुरु होते.मात्र, दिवाळीनंतर हे काम थांबलेले दिसून येत आहे. तर काही ठिकाणी ओबङ-धोबड पध्दतीने हे काम सुरु आहे. मनपाचे बांधकाम विभागाचे अभियंताही रजेवर गेल्याने या कामाकडे कोणाचेही लक्ष दिसून येत नाही.कलेक्टर व एसपी कार्यालयासमोर व्यवस्थित काममनपाकडून शहरातील गतिरोधक काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, काव्यरत्नावती चौक ते स्टेडीयम कॉम्पलेक्सपर्यंतच्या रस्त्यावर मनपाकडून व्यवस्थित काम झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व एसपी आॅफीस समोर गतिरोधक काढून रस्त्याशी समतल जागा करण्यात आली आहे. मात्र, इतर ठिकाणी असे चोख काम होताना दिसत नसून, एक तर गतिरोधक अपूर्ण काढले आहेत तर काही ठिकाणी गतिरोधक काढून जास्तच खड्डा पाडला आहे.उपनगर व इतर रस्त्यांवर परिस्थिती खराबगणेश कॉलनी, शिवाजी नगर, चित्रा चौक परिसर, रिंगरोड या भागातील रस्त्यांवरून गतीरोधक काढण्याचे काम ओबड-धोबड पध्दतीने झालेले दिसून येतआहे. याठिकाणी काम करताना जेसीबीव्दारे गतिरोधकाचे डांबरचे गोळे तसेच रस्त्यात पडू दिले जात आहेत. मनपाकडून रस्त्यांची दुरुस्तीही केली जात नाही तर दुसरीकडे गतीरोधक काढण्याचे काम देखील व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव