समता सैनिक दलाचा मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठिंबा : प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 04:04 PM2020-10-01T16:04:30+5:302020-10-01T16:05:45+5:30

मराठा समाज बांधवांनी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे त्या मागणीस समता सैनिक दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे.

Statement of Samata Sainik Dal to the administration regarding public support for reservation of Maratha community | समता सैनिक दलाचा मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठिंबा : प्रशासनाला निवेदन

समता सैनिक दलाचा मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठिंबा : प्रशासनाला निवेदन

Next

चाळीसगाव : मराठा समाज बांधवांनी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे त्या मागणीस समता सैनिक दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबत राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, हे आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला जे प्रचलित १९ टक्के आरक्षण दिले गेले आहे. त्यास कसलाही धक्का न लागता कामा नये. मराठा समाजास त्यांच्या संख्येच्या प्रमाणात स्वतंत्ररीत्या आरक्षण देण्यात यावे.यावर अंमलबजावणी न झाल्यास मराठा व ओबीसी समाजाच्या या मागणीसाठी समता सैनिक दलदेखील त्यांच्या होणाऱ्या आंदोलनात सहभागी राहील. शासनाने याची नोंद घेऊन मराठा समाजास न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर धर्मभूषण बागुल, विजय निकम, भाईदास गोलाईत, स्वप्नील जाधव, विष्णू जाधव, सचिन गांगुर्डे, बाबा पगारे, दीपक बागुल, जीवन जाधव, सचिन मोरे, प्रकाश बागुल व विशाल पगारे या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

 

Web Title: Statement of Samata Sainik Dal to the administration regarding public support for reservation of Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.