शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीच्या स्लॅबचे प्लास्टर पुन्हा कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

शिरसोली प्र. बो. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे काम २०१९-२० या वर्षात नव्यानेच झाले असून गेल्या तीन महिन्यांपूर्वीच या इमारतीचे ...

शिरसोली प्र. बो. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे काम २०१९-२० या वर्षात नव्यानेच झाले असून गेल्या तीन महिन्यांपूर्वीच या इमारतीचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठामंत्री तथा पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले आहे. ग्रामपंचायत इमारत नवीन असली तरी या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर वेगवेगळ्या ठिकाणी सहा महिन्यांत चार वेळा कोसळले आहे व लागलीच डागडुजीही करण्यात आली असली तरी पुन्हा प्लास्टर कोसळल्याने खळबळ उडाली आहे.

सोमवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात संगणक कक्षात कर्मचारी श्रीकांत बारी, चिंधू बारी व रोहिदास तायडे हे काम करीत असताना अचानक स्लॅबच्या प्लास्टरचा भाग कोसळला. दैवबलवत्तर म्हणून या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले आहेत. संबंधित प्लास्टर पुन्हा पुन्हा ढासाळत असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे.

----------------

अधिकारी, ठेकेदार यांच्या चौकशीची मागणी

ग्रामपंचायत इमारतीच्या कामाला दोनच वर्षे झाले असले तरी अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व इमारतीचे मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.