'शावैम' मध्ये दिवसभरात १४० जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:44+5:302021-02-05T05:57:44+5:30

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्ससह कक्षसेवक, परिचारिका, परिचारक यांनी पुढाकार ...

In Shawim, 140 people were vaccinated during the day | 'शावैम' मध्ये दिवसभरात १४० जणांनी घेतली लस

'शावैम' मध्ये दिवसभरात १४० जणांनी घेतली लस

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्ससह कक्षसेवक, परिचारिका, परिचारक यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी ३ फेब्रुवारी रोजी दिवसभरात १४० जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटची 'कोविशील्ड' ही लस तयार झाली आहे. कोरोना लसीविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी भीती आहे. मात्र आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील पहिली लस घेऊन ही भीती दूर करीत आदर्श निर्माण केला आहे. आतापर्यंत ८८५ जणांनी "शावैम" मध्ये लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. ऋषिकेश येऊळ, डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. याठिकाणी अधिपरिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचरिका जयश्री वानखेडे, कुमुद जवंजार, गायत्री पवार, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, बापूसाहेब पाटील, वर्षा निकम , स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले आहे.

Web Title: In Shawim, 140 people were vaccinated during the day