शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेहरूण तलावात जाणारे सांडपाणी नाल्याकडे वळविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

दोन कोटींची तरतूद करण्याचे महापौरांचे आदेश : पुढील महासभेत मिळणार मंजुरी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचे वैभव असलेल्या ...

दोन कोटींची तरतूद करण्याचे महापौरांचे आदेश : पुढील महासभेत मिळणार मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावात गेल्या अनेक वर्षांपासून जात असलेल्या सांडपाण्यामुळे तलावाचे वैभव हरवले जात होते. याबाबत ‘लोकमत’ने प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधल्यानंतर मंगळवारी महापौर जयश्री महाजन यांनी तलावाची पाहणी करत सांडपाण्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी, तलावात जाणारे सांडपाणी नाल्याकडे वळविण्याचे आदेश मनपाच्या बांधकाम विभागाला दिले आहेत. यासाठी दोन कोटींची तरतूद करून आगामी महासभेत प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला केल्या.

गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’ने शहरातील मेहरूण तलावात जाणाऱ्या सांडपाण्यावर कायमचा तोडगा करण्याबाबत लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सांडपाण्यामुळे मेहरूण तलावातील जैवविविधतेला निर्माण झालेल्या धोक्याकडे देखील लक्ष वेधले होते. अखेर या वृत्ताची दखल घेत मंगळवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सायंकाळी पाच वाजता मेहरुण तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी भारती प्रतिष्ठानच्या सुजाता देशपांडे, आनंद मल्हारा, माजी नगरसेवक विजय वाणी यांच्यासह मनपाचे शहर अभियंता अरविंद भोसले, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांच्यासह मनपाचे आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित होते. नेहरूनगर परिसरातून तलावात येणाऱ्या सांडपाण्याची महापौरांनी पाहणी केली. तसेच तलावात जाणारे सांडपाणी व्यवस्थापन करण्याबाबत मनपा अभियंता यांना सूचना दिल्या.

बंधाऱ्याच्या पलीकडील नाल्यामध्ये सांडपाणी वळवणार

नेहरूनगर परिसरातून येणारे पाणी तलावातच सोडण्याशिवाय दुसरा पर्याय या भागात नसल्याचे आढळून आले, या भागातील सांडपाणी दुसऱ्या ठिकाणी वळविण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठी मोठा खर्च लागणार असल्याचे मनपा अभियंत्यांनी महापौरांना सांगितले. त्यावर महापौरांनी खर्चाचा विचार न करता तलावातील सांडपाण्यावर कायमचा तोडगा काढण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार तलावाच्या बंधाऱ्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात या भागातील सांडपाणी वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपा अभियंत्यांना दिल्या आहेत. तसेच यासाठी अंदाजे दोन कोटींच्या खर्च अपेक्षित असून याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्याच्या सूचना देखील महापौरांनी दिल्या आहेत.