शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

डंपर-कारच्या धडकेत सात वर्षीय बालिका ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:20 IST

खेडीजवळील हॉटेल गौरवजवळ रात्री ११.१५ वाजेची घटना : चार जण जखमी

जळगाव- शहरात नातेवाईकाचा वाढदिवस साजरा करून भुसावळसाठी निघालेल्या मनवाणी कुटूंबीयांच्या कारला शनिवारी रात्री ११.१५ वाजता भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा पुढील भागाचा चुराडा झाला तर स्वरा मनवाणी या सात वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना खेडीजवळील हॉटेल गौरवसमोर घडली़ या अपघात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.भुसावळ येथील गौतम मनवाणी (वय-३५), प्रिती मनवाणी (वय-३०), माही मनवाणी (वय-१२) तसेच स्वरा मनवाणी (वय-०७) तसेच वैभव मुलचंदाणी (वय-३०, रा़ हौशंगाबाद, मध्यप्रदेश) हे शनिवारी कारने (एमएच.१९.बीजे.९६८) जळगाव शहरात किर्तीका मनवाणी हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. वाढदिवस साजरा झाल्यानंतर सर्व चित्रपट पाहण्यासाठी खान्देश सेंट्रल मॉल येथे आले. त्यानंतर रात्री तेथूनच मनवाणी कुटूंब आणि वैभव मुलचंदाणी हे त्यांच्या कारने भुसावळ येथे जाण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, भुसावळ येथून एमएच.२१.एक्स.५१९३ क्रमांकाचा डंपर हा जळगावच्या दिशेने येत होता. तर खेडी गावाजवळील हॉटेल गौरवसमोरील महामार्गावर मनवाणी कुटूंबीयांच्या कारला या डंपरने जोरदार धडक दिली. आणि या भिषण अपघातात स्वरा मनवाणी या सात वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील गौतम मनवाणी, वैभव मुलचंदाणी, प्रिती मनवाणी, माही मनवाणी हे गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्वरित जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर चौघांना खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी नातेवाईकांची रूग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव