शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

डीआयजींसह एसपींना खंडपीठाची नोटीस

By admin | Updated: April 7, 2017 15:48 IST

याप्रकरणाची फाईल बंद केली़ फिर्यादी माहेती याने पंतप्रधान, राष्ट्रपतींर्पयत पाठपुरावा केला़ अखेर न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़

जळगाव : तोतया आयकर अधिकारी असल्याचे सांगून बंगाली दागिन्यांचे कारागीर गुरुदेव रामपद माहेती यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत 2 किलो सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना 17 जून 2015 रोजी रिधुरवाडय़ात घडली होती़ आरोपी निष्पन्न न झाल्याचे सांगून शनिपेठ पोलिसांनी याप्रकरणाची फाईल बंद केली़ फिर्यादी माहेती याने पंतप्रधान, राष्ट्रपतींर्पयत पाठपुरावा केला़ अखेर न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ त्याची दखल घेत खंडपीठाने विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक               तसेच पोलीस निरीक्षक या सर्व अधिका:यांना नोटीस बजावली असून या प्रकरणी दहा दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देशित केले आह़ेमारहाण करत 50 लाखांचे दागिने लुटून नेलेसोन्याचे बंगाली कारगीर गुरुदेव माहेती हे पत्नी व तीन मुलींसह रिधुरवाडय़ात रहात होत़े त्यांचे पौलवी पूनम ज्वेलर्स नावाचे दुकान होत़े 17 जून रोजी दुपारी 1 वाजता तोतया आयकर अधिकारी असल्याचे सांगत सहा ते सात जणांना चाकूचा धाक दाखवित व मारहाण करत 50 लाख रुपये किमतीचे 2 किलो 111 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून नेले होत़े याप्रकरणी गुरूदेव माहेती यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात अज्ञात सहा जणांविरोधात भादंवि कलम 395, 397 व 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यात आरोपीचा शोध लागत नसल्याचे सांगून पोलिसांनी सहा महिन्यांनंतर 31 जानेवारी 2016 रोजी गुन्ह्याची फाईल बंद केली़ शनिपेठ पोलिसांकडून माहेती यांना उडवाउडवीचे उत्तरे मिळत होती़ त्यातच स्थानिक गुन्हे शाखेकडूनही माहेती याला वाईट वागणूक मिळाली़ अखेर माहेती यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती यांना मेलव्दारे पत्र पाठविल़े अथक परिश्रमानंतर 18 फेब्रुवारी 2016 रोजी प्रत्यक्ष पंतप्रधान, राष्ट्रपती कार्यालय गाठल़े लेखी पत्राव्दारे न्याय मिळावा यासाठी साकडे घातल़े  माहेती यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावला़ न्यायमूर्ती के ़के ़सोनवणे व न्यायमूर्ती एस़एस़ शिंदे यांच्या व्दिस्तरीय खंडपीठासमोर या याचिकेवर कामकाज झाल़े खंडपीठाने विशेष पोलीस महानिरीक्षकांसह संबंधित अधिका:यांना नोटीस बजावली असून 13 एप्रिलर्पयत म्हणणे मांडावे असे आदेश दिले आह़े तसेच दरोडय़ाच्या गुन्ह्याचा तपास हा  सीबीआयकडे सोपविण्याबाबतही याचिकेत नमूद आह़ेमुलींच्या लग्नासाठीचे पैसे झाले खर्च दरोडय़ाच्या गुन्ह्याचा तपास होऊन न्याय मिळावा, यासाठी एक सामान्य व्यक्ती काय करू शकतो, याचे उदाहरण गुरुदेव माहेती याच्या रूपाने समोर आले आह़े 19 वर्षापासून जळगावात वास्तव्यास असलेल्या माहेती यांना दरोडय़ाच्या घटनेने हलाखीच्या परिस्थतीमुळे कुटुंब पश्चिम बंगालमधील कुलाट या गावी हलवावे लागल़े यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यार्पयत पोहचण्यासाठी मुलींच्या लग्नासाठीचे पैसे खर्च झाल़े स्वत:च्या अंगावरील चैन, अंगठी सुध्दा मोडावी लागली़ सर्वाचे डोळे पाणावतील अशीच माहेती यांची कहाणी आह़े पैसा नाही मिळाला चालेल़ मात्र याप्रकरणी संबंधित अधिका:यांवर कारवाई व्हावी व मला न्याय मिळावा, असे गुरुदेव माहेती यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़े