सव्वा लाखाचे दागिने लांबविले

By Admin | Updated: September 19, 2015 00:32 IST2015-09-19T00:32:30+5:302015-09-19T00:32:30+5:30

शेंदुर्णी : येथील प्रतिष्ठित व्यापारी कस्तुरचंद रतनचंद जैन यांच्या घरी 10.30च्या सुमारास दोन अज्ञात भामटय़ांनी सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो अशा बहाण्याने एक लाख 26 हजारांचे दागिने लुटून नेले.

Savvy lacquer jewelry has been delayed | सव्वा लाखाचे दागिने लांबविले

सव्वा लाखाचे दागिने लांबविले

शेंदुर्णी : येथील प्रतिष्ठित व्यापारी कस्तुरचंद रतनचंद जैन यांच्या घरी 10.30च्या सुमारास दोन अज्ञात भामटय़ांनी सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो अशा बहाण्याने एक लाख 26 हजारांचे दागिने लुटून नेले.

दोघा युवकांनी जैन मंदिराच्या मागे असलेल्या कस्तुरचंद जैन यांच्या घरातील महिलांना प्रथम चांदीचे भांडे पॉलिश करून दिले. त्यानंतर महिलांचा विश्वास संपादन केल्यानंतर सोन्याच्या दागिन्यांनाही पॉलिश करतो असे सांगितले. त्यानुसार त्या महिलांनी 35 ग्रॅमचे मणीमंगळसूत्र व इतर दागिने (त्यांची एकूण किंमत 1 लाख 26 हजार) दिले. चोरटय़ांनी काही वेळेनंतर हे दागिने घेऊन पलायन केले. परिसरातील नागरिकांनी भामटय़ांना शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते मिळू शकले नाही. (वार्ताहर)

Web Title: Savvy lacquer jewelry has been delayed