रोटरी वेस्टने दिला महिलेला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:29+5:302021-06-04T04:14:29+5:30

फोटो : 12.53 वाजेचा मेल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे दोन लहान मुलांसह कुटुंब चालवणे ...

Rotary West gives a helping hand to a woman | रोटरी वेस्टने दिला महिलेला मदतीचा हात

रोटरी वेस्टने दिला महिलेला मदतीचा हात

फोटो : 12.53 वाजेचा मेल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे दोन लहान मुलांसह कुटुंब चालवणे कठीण झाले होते. म्हणून रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रेखा एकनाथ चव्हाण यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्यावतीने शिलाई मशीन देऊन मदतीचा हात देण्‍यात आला आहे.

यावेळी वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल, प्रकल्प प्रमुख सरिता खाचणे, योगेश भोळे आदींची उपस्थिती होती. गेल्या आठवड्यात दुकानाला आग लागलेल्या संजय सोनवणे या टेलरिग काम करणाऱ्यांना रोटरी वेस्टने मदत म्हणून अत्याधुनिक शिलाई मशीन दिली होती. याची वृत्तपत्रातील बातमी वाचून चव्हाण यांनी रोटरी वेस्टशी संपर्क केला होता. त्यानंतर रोटरी वेस्टने त्यांना मदतीचा हात दिला. यावेळी मुनिरा तरवारी, सचिन वर्मा, सुनील सुखवानी, महेश सोनी, संजय इंगळे, गौरव सफळे, अनुप असावा, देवेश कोठारी, दिग्विजय पाटील, अमृत मित्तल, धीरज फटांगळे आदींचीही उपस्थिती होती.

Web Title: Rotary West gives a helping hand to a woman