शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून बंद असलेल्या घरावर प्रतिबंधित क्षेत्राचा बोर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST

मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार : लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील नवीपेठ भागातील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या घरावर ...

मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार :

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील नवीपेठ भागातील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या घरावर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राचा बोर्ड लावला असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या घरात सद्य:स्थितीत कोणीही राहत नसून अशा परिस्थितीत महापालिकेने या घरावर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा बोर्ड लावल्याने मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.

मनपा प्रशासनाकडून एखाद्या नागरिकाला कोरोनाची लक्षणे जाणवली, तर नागरिक ॲण्टिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करतात. या चाचणीत जर नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले तर त्यांना कोविड सेंटर अथवा कोविड रुग्णालयात भरती केली जाते. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात, त्यांना गृहविलगीकरणातदेखील ठेवण्याची परवानगी महानगरपालिकेच्या विभागाकडून दिली जाते. त्यानंतर त्यांच्या घरावर प्रतिबंधित क्षेत्र असा फलकदेखील लावला जातो. मात्र, नवी पेठेतील हे घर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असताना प्रतिबंधित क्षेत्राचा बोर्ड लावला नाही, म्हणून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. हे घर डॉ. कैलास मुंगड यांचे असून या घरात कोणी राहत नाही. दरम्यान, याबाबत मनपा प्रभाग समिती अधिकाऱ्याला विचारले असता, अनेकदा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्या घराचा पत्ता देतो, त्याच घरावर प्रतिबंधित क्षेत्राचा बोर्ड लावला जातो. कदाचित, संबंधित घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आली असून या व्यक्तीने जुना पत्ता दिला असल्याने या ठिकाणी हा बोर्ड लावला गेला असल्याची शक्यता संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.