शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संबंधितांविरुद्ध कारवाईची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 23:35 IST

१० रुपयांच्या नाण्याचा प्रश्न : फौजदारी, ग्राहक संरक्षण कायद्यान्वये तक्रारीस पात्र

धुळे : देशात असलेले कायदेशीर चलन स्वीकारण्यास नकार दिल्यास त्याविरुद्ध ग्राहकास संबंधितांविरुद्ध कायद्याच्या मदतीने दाद मागता येते. त्यानुसार मग कारवाई होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. फौजदारी व ग्राहक संरक्षण या कायद्यांमध्ये त्या दृष्टीने तरतूद करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात १० रुपयांचा कॉईन घेण्यास नकार दिला जातो. त्यामुळे व्यवहार पूर्ण न होता, त्यात अडचण निर्माण होते. अशा वेळी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये ग्राहक न्यायमंचाकडे दाद मागू शकतो, अशी माहिती ग्राहक पंचायतीचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी दिली. तर अप्रामाणिकपणे अफवा पसरवणे, कारस्थान करणे या फौजदारी कायद्यातील तरतुदींनुसार रितसर तक्रार करता येते, अशी माहिती अ‍ॅड.अमित दुसाने यांनी दिली. विनिमयाचे माध्यम म्हणून सरकारने चलन काढले आहे. रिझर्व्ह बॅँकेने त्यास मान्यता प्रदान केली आहे. अशा परिस्थितीत ते चलन वैध असताना स्वीकारण्यास नकार देणे म्हणजे लोकशाहीचा अपमान समजला जातो, असेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले. ‘चॉकलेट’चे चलन स्वीकारता....!एखाद्या दुकानावर ४८ रुपयांचा माल घेतल्यानंतर ५० रुपयांची नोट दिल्यास दुकानदार सुट्या दोन रुपयांऐवजी दोन चॉकलेट हातात टेकवतो, ते आपण स्वीकारतो. ते चलन म्हणून आपल्याकडून कोणी स्वीकारत नाही, तरी ते आपण सहज स्वीकारतो. मग हे वैध नाणे स्वीकारण्यास काय हरकत आहे, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. चलनात असलेले नाणे कोणी स्वीकारत नाही म्हणून त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची कायद्यात काहीही तरतूद नाही.     - चैतन्या एस., जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे