शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन पूर्ण होईपर्यंत नियुक्त राहणार वीज कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:41 IST

महावितरण : लोंबकळलेल्या तारा व वाकलेल्या खांब्यांची दुरुस्ती

जळगाव : विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीच्या मार्गावर विद्युत तारा अथवा वीज पुरवठा वायरींचा कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी विसर्जन पूर्ण होईपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावर महावितरणचे कर्मचारी चौकाचौकात नियुक्त राहणार असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच मिरणवणुकीच्या मार्गावरील काही ठिकाणच्या लोंबकळलेल्या विद्युत तारा व वाकलेल्या खांब्याचींही दुरुस्ती करण्यात आली असल्याचे सांगितले.गणरायाचे १२ रोजी विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणतर्फे करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत संपर्क साधला असता तडवी त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवापूर्वीच शहरातील सर्व लोंबकळलेल्या विद्युत तारा व वाकलेल्या खांब्यांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच विद्युत तारांच्या ठिकाणी धोकेदायक ठरणाºया झाडांच्या फांद्याही तोडण्यात आल्या. तसेच उघड्यावरील ट्रान्सफार्मरांना संरक्षण जाळी बसविण्यात आल्या आहेत.चौकाचौकात राहणार वीज कर्मचारीकोर्ट चौक ते थेट मेहरुण तलावापर्यंत या विसर्जन मिरवणुकीच्या शाखा अभियत्यानांही त्यांच्या परिसरातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या मंडळांच्या २५ ते ३० फुटांच्या वर मूर्ती आहेत,अशा मंडळाच्या मिरवणुकीच्या मार्गावरही कुठेही विद्युत तारांचा अडथळा येऊ नये, यासाठी महावितरणचे कर्मचारी विसर्जन होईपर्यंत देखरेख ठेवतील. तसेच मेहरुण तलावावरही कर्मचारी नियुक्त राहणार असून, विसर्जनाच्या दिवशी विजेच्या संदर्भात समस्या उद्भवल्यास महावितरणच्या शाखा कार्यालय किंवा नियंत्रण कक्षाच्या मोबाईल क्रमाकांवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीJalgaonजळगाव