शिवसेनेतर्फे ५५ वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:12 IST2021-06-06T04:12:28+5:302021-06-06T04:12:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जागतिक पर्यावरण दिन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५५ वृक्षांचे रोपण शिवसेना ...

Planting of 55 trees by Shiv Sena | शिवसेनेतर्फे ५५ वृक्षांचे रोपण

शिवसेनेतर्फे ५५ वृक्षांचे रोपण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जागतिक पर्यावरण दिन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ५५ वृक्षांचे रोपण शिवसेना जळगाव महानगरतर्फे शहरात करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, सचिव अमित जगताप, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, युवा संघर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्जुन भारुळे, प्रीतम शिंदे, तुषार दापोरेकर, गोकुळ बारी, अमोल गोपाळ, सुरेश पाटील, रवींद्र सपकाळे, उमाकांत जाधव, पीयूष हसवाल, पीयूष तिवारी, प्रशांत वाणी, प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी आदी उपस्थित होते.

या भागांमध्ये वृक्षारोपण

गणेशवाडी, मुख्य पोस्ट ऑफिस, तुकारामवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. गुलमोहर, कडूनिंब, अशोका, आवळा शिसम, सप्तपरणी, आंबा आदी वृक्ष लावण्यात आले. वृक्षांना सुरक्षेच्या दृष्टीने तारेची जाळी सुद्धा लावण्यात आली.

Web Title: Planting of 55 trees by Shiv Sena