पितृपक्षाचा अंगारकी यात्रेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 21:46 IST2019-09-17T21:44:43+5:302019-09-17T21:46:21+5:30

पितृपक्षात अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने श्री क्षेत्र पद्मालय येथे मंगळवारी भाविकांच्या उपस्थितीत घट दिसून आली.

Patriarch hits Angarki Yatra | पितृपक्षाचा अंगारकी यात्रेला फटका

पितृपक्षाचा अंगारकी यात्रेला फटका

ठळक मुद्देअवघ्या ३५ हजार भाविकांची हजेरीपद्मालयच्या तलावात फुललेली कमळाची फुले जणूकाही भाविकांचे स्वागत करीत होती

एरंडोल, जि.जळगाव : या वेळी पितृपक्षात अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने श्री क्षेत्र पद्मालय येथे मंगळवारी भाविकांच्या उपस्थितीत घट दिसून आली. या अंगारिकेला ३० ते ३५ हजार भाविकांनी हजेरी लावली. याप्रसंगी जिल्ह्यासह महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी आले होते. तसेच श्री क्षेत्र पद्मालयच्या तलावात फुललेली कमळाची फुले जणूकाही भाविकांचे स्वागत करीत होती.
ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ३.३० वाजता जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी मंदिराचे पुजारी केशव पुराणिक यांच्या मंत्रोच्चाराने पूजा करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, मंडळ अधिकारी जाधव, महसूल कर्मचारी तथा देवस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. यावेळी मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच श्री क्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीच्या योग असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनबारी, स्वयंसेवक, रुग्णवाहिका, पोलीस बंदोबस्त, जनरेटर व महामंडळातर्फे एस.टी. बसेसची व्यवस्था व डॉ.पी.जी.पिंगळे यांच्यातर्फे सालाबादाप्रमाणे या वेळेसही मोफत वैद्यकीय सेवा भाविकांसाठी पुरविण्यात आली.

Web Title: Patriarch hits Angarki Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.