शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढताना पक्षपात

By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST

शहरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात झाल्याचा आरोप करण्यात आला.

नवापूर : शहरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपात झाल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील युवकांच्या गटाकडून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून हा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, १८ रोजी स्थगिती झालेली अतिक्रमण काढण्याची मोहीम १९ रोजी पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.पालिकेकडून १७ रोजी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. विविध भागातील एकूण २१ अतिक्रमणे काढण्यात आली. त्यात पक्के आर.सी.सी. बांधकाम असलेल्या नऊ इमारती व इमारतींच्या भागाचा समावेश आहे.बसस्थानक परिसरात दुपारी साडेचारला अतिक्रमण काढताना काही युवक व पालिका कर्मचारी यांच्यात वाद झाला होता. हाच धागा पकडून युवकांच्या गटाकडून मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.पोलीस निरीक्षक शेळके यांनाही निवेदन देण्यात आले. ठरावीक लोकांचे बांधकाम तोडणे व त्याच रांगेतल्या इतरांना सोडून देण्यात आल्याचा प्रकार शहरवासीयांनी पाहिल्याचे निवेदनात म्हटले आहे. बसस्थानक परिसरात काढण्यात आलेले अतिक्रमण नोटीस न देता काढण्यात आल्याचा आरोप करून गरिबांचा वाली कुणी नसल्याने प्रशासनाने ही कारवाई केली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.हीच कारवाई राजकीय व्यक्तींच्या विरोधात करण्याचे धैर्य प्रशासन दाखवेल का, ही कारवाई एकतर्फी आहे. अशी कारवाई त्वरित न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा प्रदीप नगराळे, आसिफ शेख, दशरथ नगराळे, संजय मावची, जहूर मकराणी, आरिफ फ्रूटवाला, भावेश वाघ, इकबाल पठाण, विजय कोकणी, उमेश पवार, सुनील पेंढारकर व सहकार्‍यांनी दिला आहे. (वार्ताहर)