महामार्गाच्या ठेकेदाराला ३८ लाखांचा दंड भरण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST2021-07-01T04:12:54+5:302021-07-01T04:12:54+5:30

जळगाव : शासकीय कामात अवैध वाळू वापरल्याच्या प्रकरणात औरंगाबाद रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार संस्थेला जामनेर तहसीलदारांनी ३८ लाख ४ ...

Order to pay fine of Rs 38 lakh to highway contractor | महामार्गाच्या ठेकेदाराला ३८ लाखांचा दंड भरण्याचे आदेश

महामार्गाच्या ठेकेदाराला ३८ लाखांचा दंड भरण्याचे आदेश

जळगाव : शासकीय कामात अवैध वाळू वापरल्याच्या प्रकरणात औरंगाबाद रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार संस्थेला जामनेर तहसीलदारांनी ३८ लाख ४ हजारांचा दंड ठोठावला आहे. हा दंड भरण्याची नोटीस या आधी पाठवण्यात आली होती. मात्र आता तहसीलदारांनी हा दंड भरण्याचे आदेश जे. बी. कन्स्ट्रक्शनचे पी. व्ही. श्रीनिवास यांना दिले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी तक्रार दिली होती.

कामाच्या ठिकाणी १००५ ब्रास वाळूसाठा अवैध आढळून आला होता. त्याबाबत कंपनीने केलेल्या खुलाशानुसार १८४ ब्रास वाळू शेगाव (जि. बुलडाणा) येथून उचल केल्याचे दिसून आले आहे. मात्र त्याची पडताळणी केली असता हा वाळूसाठा शेगाव ते बारामती व आळंदी असा केलेला दिसून आला आहे. जामनेर तालुक्यात कंपनीची साइट असल्याने सुनसगाव येथील कोणतीही पावती आढळून आलेली नाही. त्यामुळे १८४ ब्रास वाळू ही अवैध उत्खनन करून वाहतूक केल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार १८४ ब्रास वाळूची रॉयल्टी ५ लाख ९१ हजार ३६३ रुपये होते. त्याच्या पाच पट रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.

कोट - आम्हाला हे आदेश प्राप्त झाले आहेत, मात्र त्याविरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करणार आहोत. आमच्याकडे वाळूच्या सर्व पावत्या योग्य प्रमाणात आहेत.- पी. व्ही. श्रीनिवास

Web Title: Order to pay fine of Rs 38 lakh to highway contractor