शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅट आधारित कराचा शासनाचा पर्याय

By admin | Updated: July 1, 2014 14:50 IST

मनपाच्या हद्दीत आकारण्यात येत असलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) पर्याय म्हणून शासनाने व्हॅटवर आधारित कराचा नवीन पर्याय सुचविला आहे.

एलबीटी : व्यापारी महासंघाचा मात्र विरोध
 
जळगाव : मनपाच्या हद्दीत आकारण्यात येत असलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) पर्याय म्हणून शासनाने व्हॅटवर आधारित कराचा नवीन पर्याय सुचविला आहे. त्याबाबत व्यापारी संघटनांकडून मत मागविले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य व्यापारी महासंघाने हा पर्यायही नाकारला आहे. 
जकातही नको अन् एलबीटीही नको, अशी भूमिका घेत व्यापार्‍यांनी एलबीटीला विरोध दर्शविला आहे. व्यापार्‍यांच्या नाराजीची दखल घेत राज्य शासनाने याबाबत सर्व मनपाच्या महापौर व आयुक्तांची बैठक घेऊन पर्यायांवर चर्चा केली. तसेच महापौरांनी व्यापार्‍यांची मते जाणून घेतली. मात्र व्यापार्‍यांनी केवळ व्हॅटवर सरचार्ज आकारण्याचाच पर्याय मान्य केला असून अन्य पर्याय नाकारले आहेत. त्यामुळे शासनातर्फे व्हॅटवर आधारित कराचा नवीन पर्याय सुचविण्यात आला आहे. मात्र त्यालाही व्यापारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. 
फॅमची बैठक
दरम्यान जिल्हा व्यापारी महामंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम) तर्फे २६ महानगरपालिका क्षेत्रातील समिती प्रतिनिधींची बैठक २७ जून रोजी ठाणे येथे झाली. 
त्यात राज्य शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव आयकर आयुक्त नितीन करे, ठाणे मनपा आयुक्त असीमकुमार गुप्ता, फॅमचे अध्यक्ष मोहन गुरुनानी व २२ मनपा क्षेत्रातील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. 
त्यात नवीन पर्यायाची माहिती देण्यात आली. त्याबाबत फॅमला मत कळविण्यास सांगितले आहे. या सभेला फॅमचे उपाध्यक्ष व जिल्हा व्यापारी महामंडळाचे सहसचिव ललित बरडिया, पानमसाला असोसिएशनतर्फे माधवदास भोजवानी, दिलीप झाबक उपस्थित होते. मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे बरडीया यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मनपा क्षेत्रातच लागेल. तालुकाक्षेत्रात लागणार नाही. त्यामुळे वस्तूंच्या दरातील तफावत कायमच राहील. तसेच एलबीटी व नवीन करात फरकच नाही. केवळ वसुली यंत्रणा बदलणार आहे. तसेच अनेक मुद्यांबाबत शासनाची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्हाला शासनावर आता विश्‍वास नाही. त्यामुळे आमचा विरोध कायम असल्याचे व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी 'लोकमत' शी बोलतांना सांगितले.
 
एलबीटीला पर्याय असलेला नवीन कायदा 
■ एलबीटीच्या जागी येणार्‍या कायद्याचे नाव बदलेल. 
■ नवीन कराचे नियम हे व्हॅटच्या नियमांप्रमाणेच असतील. व्हॅट व नवीन कर यांचा वेगळा उद्देश व दोन विभिन्न एजन्सीजकडून होणारा वापर या बाबी लक्षात घेऊन त्यात काही सुधारणा असतील. 
■ नवीन करप्रणालीचे व्यवस्थापन व नियमन विक्रीकर विभागामार्फत होईल. 
■ व्हॅट व नवीन करासाठी स्वतंत्र चलन असेल. मात्र दोन्ही कर सोबतच भरावे लागतील. 
■ शहरात येणार्‍या मालावर हा कर आकारला जाईल. मात्र शहराबाहेरून जाणार्‍या मालावर कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. तसेच शहरात आणलेला माल सहा महिन्यांच्या आत बाहेरगावी पाठविला तर त्यावर टॅक्स आकारला जाणार नाही. त्यामुळे सध्या आकारण्यात येत असलेले पारगमन शुल्कही रद्द होण्याची शक्यता आहे. 
■ वेगवेगळ्या मनपांमार्फत एकाच प्रकारच्या मालावर आकारल्या जाणार्‍या कराच्या दरातील तफावत कमीत कमी असेल. तसेच नवीन कायद्यानुसारची अँसेसमेंट ही व्हॅट असेसमेंटसोबतच केली जाईल. जेणेकरून व्हॅट व नवीन कायद्यासाठी एकच खिडकी राहील. 
■ नोंदणीसाठीची र्मयादा १0 लाखाची असेल. तसेच व्हॅट लागू असलेल्या वस्तूंनाच नवीन कर लागू राहील.