एका नवºयाच्या दोन बायकांमध्ये ‘फ्री-स्टाईल’

By Admin | Updated: March 6, 2017 01:09 IST2017-03-06T01:09:53+5:302017-03-06T01:09:53+5:30

पोलीस ठाण्यातच वाद : नवºयासह दोन्ही बायकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

One of the two wives of 'New Style' has 'free-style' | एका नवºयाच्या दोन बायकांमध्ये ‘फ्री-स्टाईल’

एका नवºयाच्या दोन बायकांमध्ये ‘फ्री-स्टाईल’

जळगाव : ‘दोन बायका अन् फजिती ऐका’ या मराठी चित्रपटातील कथेशी मिळती-जुळती घटना शहरातील एका कुटूंबात असून दोन बायकांमधील हा वाद रविवारी शहर पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला. शब्दामागे शब्द वाढल्याने पोलिसांसमक्षच दोन्ही बायकांमध्ये फ्रि स्टाईल  झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करुन ही हाणामारी सोडविली. दरम्यान, मुळ वाद बाजूला राहिला व या बायकांसह त्यांच्या नवºयाविरुध्द पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
एका नवºयाच्या दोन बायका रविवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात परस्पराविरूध्द तक्रार देण्यासाठी आल्या होत्या.शहरातील सुधीर या तरुणाचे काही वषापूर्वी पूजा (तिघांचे नाव बदलले आहे) तरुणीशी विवाह झाला होता. मात्र, तिला लग्नानंतर काही वर्षातच नवºयाने माहेरी पाठवून दिले होते. 
त्यानंतर त्याने धनश्री या तरुणीशी लग्न केले. पूजाला एक मुलगा आहे. तीन-चार दिवसांपूर्वी पूजा ही मुलाला घेवून सुधीर याच्याकडे आली व मुलाचा सांभाळ करावा अशी मागणी केली. त्यावरुन पूजा व धनश्री या दोघींमध्ये वाद झाले. रविवारी दुपारी साडे बारा वाजता पूजा ही नात्यातील तालुक्यातील एका गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेला सोबत घेऊन शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. त्यापाठोपाठ सुधीर व त्याची धनश्री  देखील तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले.पूजा तक्रार देत असतांना धनश्री हिने तिच्याशी वाद घालत कानशिलात लगावली. त्यानंतर पूजाने लगावली. दोघांमध्ये इतका वाद झाला की एकमेकीचे केस ओढून त्यांनी जमिनीवर पाडले. हा प्रकार पाहून पोलीसही अचंबित झाले. शेवटी पोलिसांनी दोन्ही बायकांसह तिच्या नवºयाविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केली. यानंतर तिघांना तेथून रवाना करण्यात आले.
 

Web Title: One of the two wives of 'New Style' has 'free-style'