गोवंश मास विक्रीसाठी घेऊन जाताना एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:30+5:302021-09-02T04:35:30+5:30

फैजपूर, ता. यावल : गोवंश जातीचे सुमारे २०० किलो मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना फैजपूर पोलिसांच्या पथकाने ...

One arrested while taking beef for sale | गोवंश मास विक्रीसाठी घेऊन जाताना एकास अटक

गोवंश मास विक्रीसाठी घेऊन जाताना एकास अटक

फैजपूर, ता. यावल : गोवंश जातीचे सुमारे २०० किलो मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना फैजपूर पोलिसांच्या पथकाने एकास अटक केली. आरोपी सलीम शब्बीर तडवी (वय ४३, रा. इस्लामपुरा) याच्या ताब्यातून सदरचे गोवंश मास ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी ही कारवाई केली.

नव्याने रुजू झालेल्या सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, इदगाह मैदानामागे असलेल्या पत्री शेडमध्ये २५ हजार रुपये किमतीचे २०० किलो गोवंश जातीचे मांस तीन टाक्यांमध्ये भरून ठेवले होते. हे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मकसूद शेख, हे.काॅ. रवींद्र मोरे, हेमंत सांगळे, चेतन महाजन यांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, आरोपी सलीम तडवी यास अटक करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरे करीत आहेत.

Web Title: One arrested while taking beef for sale