मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 17:37 IST2020-09-07T17:34:37+5:302020-09-07T17:37:10+5:30
काँग्रेस भवनाच्या आवारात हे दहन करण्यात आले.

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन
जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान उडवून देण्याची धमकी आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांनी दिली होती. याचा निषेध म्हणून एनएसयूआयच्यावतीने सोमवारी दाऊदच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. काँग्रेस भवनाच्या आवारात हे दहन करण्यात आले.
केंद्ररकार भारतातील जनतेच्या भावनांशी जो काही खेळ करीत आहे, तो तात्काळ थांबवावा व दाऊदला दुबई व पाकिस्तान सरकारने आश्रय दिलेला आहे. तसेच तो मुंबइ बॉम्ब स्फोटामधील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम याला भारतात पकडून आणण्यासाठी आपली शक्ती लावावी, अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, उपाध्यक्ष शाम तायडे, अमजद पठाण, पी. जी. पाटील, वासुदेव महाजन, भरत ललवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर
मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक