पारोळा विस्तार अधिकारी सुनील पाटील यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:55 IST2017-03-18T00:55:26+5:302017-03-18T00:55:26+5:30

जळगाव : इंधवे ता.पारोळा येथील अनधिकृत घरकुलाच्या कामासंबंधी चौकशी करून चार दिवसात अहवाल दिला नाही

Notice to Parola Extension Officer Sunil Patil | पारोळा विस्तार अधिकारी सुनील पाटील यांना नोटीस

पारोळा विस्तार अधिकारी सुनील पाटील यांना नोटीस


जळगाव : इंधवे ता.पारोळा येथील अनधिकृत घरकुलाच्या कामासंबंधी चौकशी करून चार दिवसात अहवाल दिला नाही म्हणून पारोळा पं.स.मधील विस्तार अधिकारी तथा ग.स.चे संचालक सुनील अमृत पाटील यांना जि.प.च्या ग्रा.पं. विभागाने नोटीस बजावली आहे. याच तक्रारीबाबत जि.प.च्या ग्रामपंचायत विभागासह पारोळा गटविकास अधिकारी किंवा पं.स.ने दुर्लक्ष केले. अखेर ग्रामस्थाला राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल करावी लागली. 
इंधवे येथे दत्तात्रेय पाटील यांच्या खाजगी जागेवर घरकूल बांधण्यात येत होते. याबाबत पाटील यांनी पारोळा गटविकास अधिकारी, ग्रा.पं. विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. पण तिची दखल घेतली नाही. त्यामुळे शेवटी पाटील यांनी आपली तक्रार आपले सरकार या राज्य शासनाच्या पोर्टलवर केली. तिची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडून जि.प.ला सूचना देण्यात आल्या. नंतर जि.प.ने याबाबत पारोळा पं.स.ला चौकशीचे आदेश दिले. त्याची जबाबदारी विस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे होती. पण सुनील पाटील यांनी याबाबत चौकशी करून अहवाल वेळेत जि.प.कडे सादर केला नाही. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सुनील पाटील यांना नोटीस बजावली असून, १० दिवसात खुलासा सादर करण्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

Web Title: Notice to Parola Extension Officer Sunil Patil