शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

नवे डीन डॉ. फुलपाटील लवकरच रुजू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नागपूर येथील शरीररचना शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद फुलपाटील यांची जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नागपूर येथील शरीररचना शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद फुलपाटील यांची जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शरीरचना शास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून बदली करण्यात आली आहे. मात्र, हे पदच जळगावात रिक्त नाही. शिवाय त्यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांना नागपुरातून कार्यमुक्त केल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या जागेवर डॉ. फुलपाटील यांची बदली करण्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी अचानक प्राप्त झाले. त्यांच्यासह विविध ११ प्राध्यापकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, जळगावात ज्यामुळे पदस्थापनेवर डॉ. फुलपाटील यांची बदली झाली आहे, ते पदच रिक्त नसून आदेशात कुठलीच स्पष्टता नसल्याचे बोलले जात आहे. डॉ. रामानंद यांच्याकडे मूळ पदभार हा धुळे श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील औषधशास्त्र विभागाचे प्राध्यापकाचा असून डॉ. फुलपाटील हे रुजू झाल्यानंतर तातडीने आपण त्यांना पदभार सोपविणार असल्याची माहिती डॉ. रामानंद यांनी दिली. बदली अचानक झालेली नसून अनेक प्राध्यापकांच्या बदल्या झालेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.