शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीसाठी काटे वाढविण्याची आवश्यकता

By admin | Updated: March 9, 2017 23:57 IST

जामनेर : मोजणीत वशिलेबाजीच्या संशयाने शेतक:यांचा संताप

जामनेर : शासकीय तूर खरेदी केंद्रावर मोजणीस लागणारा विलंब लक्षात घेऊन गुरुवारी शेतकरी संघाने एक काटा वाढविला असला तरी तुरीची वाढती आवक पाहता व मोजणीसाठी थांबलेले शेतकरी यांची संख्या लक्षात घेतली तर संघाने आणखी पाच काटे वाढविण्याची मागणी होत आहे.दरम्यान, शेतक:यांच्या तुरीने भरलेल्या ट्रॅक्टरला क्रमांकाचे टोकन दिले असल्याने त्या क्रमानेच मोजणी घेणे अपेक्षित आहे. मात्र या मोजणीतदेखील कर्मचा:यांकडून वशिलेबाजी होत असल्याचा आरोप काही शेतक:यांनी केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. याचबरोबर व्यापा:यांशी लागेबांधे असल्याने काही व्यापा:यांच्या तुरीची खरेदीदेखील शेतक:यांना डावलून होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.गुरुवारी खरेदी केंद्रावर मोजणीच्या ठिकाणी व्यापा:यांची उपस्थिती दिसत असल्याने या संशयाला बळकटी येत असल्याचा आरोप शेतक:यांनी केला आहे. बुधवारी सायंकाळर्पयत 401.82 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघाच्या सूत्रांनी दिली.सध्या बाजार समिती आवारात सुमारे पाच हजार क्विंटल तूर मोजणीअभावी पडून आहे. बुधवारी रात्री ढगाळ वातावरण झाल्याने कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता पाहून उघडय़ावरील तूर बाजार समितीने शेडमध्ये ठेवू द्यावी, अशी विनंती शेतक:यांनी केली. मात्र शेड लग्नासाठी दिले जात असल्याने तूर ठेवता येणार नाही, असे कर्मचा:यांनी सांगितल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे.काटे वाढविण्यास शेतकरी संघ असमर्थतुरीची वाढती आवक पाहता काटे वाढविले पाहिजेत, अशी शेतक:यांची मागणी असली तरी वाढीव काटय़ांसाठी वाढीव कर्मचारी पुरविण्यास आम्ही असमर्थ असल्याचे शेतकरी संघाच्या सूत्रांनी सांगितले.शासनाने शेतक:यांच्या हितासाठी हमी भावाने तूर  खरेदी केंद्र सुरू केले असून एका शेतक:याच्या सातबारा उता:यावर एकरी चार क्विंटल खरेदी केली जाते. काही शेतकरी व्यापा:यांना उतारे देत असल्याने व्यापारी त्यांनी खरेदी केलेली तूर आणून विकतात. त्यामुळे शेतक:यांनी आपले उतारे व्यापा:यांना देऊ नये.-चंद्रकांत बाविस्कर,चेअरमन, शेतकरी संघ, जामनेर