शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

रा.स्व.संघाच्या सेवालयात मुस्लिम तरूणांची नमाज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:52 IST

जिल्हा रुग्णालयात एकात्मतेचे दर्शन : राम - रहिम भेटीने साजरी झाली अनोखी ईद-ए-मिलादुन्नबी

जळगाव : जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात असलेल्या रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सेवालयात रविवारी ईद-ए- मिलादुन्नबीच्या निमित्ताने जणू ‘राम - रहिम’ गळाभेट घेत आहेत, असे एकतेचे दर्शन घडले. रूग्णालयात सेवा देण्यासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी नमाजाची वेळ झाल्याने या सेवालयात नमाज पठण केले. हिंदू - मुस्लिम बांधवांनी साजरी केलेल्या ईदचे साक्षीदार झालेले सर्वच याप्रसंगाने सुखावून गेले.अयोध्या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा निघाल्याने संपूर्ण देशात सौहार्दचे दर्शन घडले आहे.यंदाच्या ईदला यामुळे देशभर एकात्मतेची अनोखी झळाळीही होती. जिल्हाभरात सर्वत्र ईद-ए- मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली़ त्या पार्श्वभूमीवर काही मुस्लीम बांधवांनी जिल्हा रूग्णालयात फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यातील काहींनी रा़ स्व़ संघाच्या जनकल्याण समितीच्या सेवालयाच्या सेवेबद्दल माहिती होती़ दोन मुस्लीम बांधवांनी या सेवालयात देणगीही दिली.दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारास नमाज पठणाची वेळ झाल्याने या मुस्लीम बांधवांनी सेवालयाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी नमाज पठण करू शकतो का? अशी विचारणा केली़ यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले, नमाज पठनानंतर त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़यावेळी विनायक वाणी, मंगला पाटील, पराग महाशब्दे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ दहा ते बारा मुस्लीम बांधवांनी या ठिकाणी नमाज पठण केले़सेवालयामार्फत दैनंदिन अन्न वाटप केले जात असते. ईदनिमित्त या तरुणांनी आपल्या स्टॉलशेजारीच फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वेळ झाल्याने त्यांनी नमाज पठणाबाबत विचारणा केली. आम्ही त्यास होकार दिला. आमच्यासाठी हा आनंद आणि गौरवदायी क्षण होता. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अशीच सद्भावना वाढीस लागावी.-दीपकराव घाणेकर, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव