शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात महावितरणची साडेनऊशें कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

कोरोनामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आल्यामु‌ळे, शासनाच्या सूचनेनुसार महावितरणतर्फे ग्राहकांना मार्च ते जूनदरम्यान सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, ...

कोरोनामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आल्यामु‌ळे, शासनाच्या सूचनेनुसार महावितरणतर्फे ग्राहकांना मार्च ते जूनदरम्यान सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेले सरासरी वीजबिल हे अवाजवी असल्याचे सांगित, अनेक ग्राहकांनी वीजबिल भरण्यास विरोध दर्शविला. यावर महावितरणतर्फे ग्राहकांच्या वीज बिलाबाबत तक्रारी सोडविण्यासाठी ठिकठिकाणी तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली. मात्र, तरीदेखील ग्राहकांकडून वीजबिलांची थकबाकी भरण्यात येत नसल्यामु‌ळे, महावितरणतर्फे यंदा जानेवारी ते मार्च दरम्यान थकबाकी दारांविरोधात तीव्र कारवाई मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तात्पुरता व कायमस्वरूपी असा २० हजाराहून अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, असे असतानाही महावितरणचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसून, साडेनऊशे कोटींच्या थकबाकीची वसुली येणे बाकी आहे.

इन्फो :

सर्वाधिक थकबाकी जळगाव जिल्ह्यात

महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या जळगाव परिमंडळात सध्या स्थितीला महावितरणची घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, पथदिवे, सार्वजनिक पाणी पुरवठा व इतर विभागांची मिळून ३ लाख १५ हजार ४४४ ग्राहकांकडे साडे नऊशें कोटी ६२ लाख इतकी थकबाकी आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ३४२ ग्राहकांकडे ५०२ कोटी ७२ लाखांची थकबाकी आहे. धुळे जिल्ह्यात ८२ हजार ४३६ ग्राहकांकडे ३२३ कोटी ४० लाखांची थकबाकी आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात ४७ हजार ६६६ ग्राहकांकडे १३२ कोटी ४३ लाखांची थकबाकी आहे. दरम्यान, महावितरणतर्फे पुन्हा थकबाकीदारांविरोधात लवकरच कारवाई मोहीम सुरू करण्यात येणार असून, नागरिकांनी तात्काळ थकीत विज बिल भरण्याचे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.