शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात केल्यानंतर अनेकांचे वजन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

जळगाव : कोरोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांमध्ये वजन वाढल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे चित्र आहे. शासकीय यंत्रणेतील पोस्ट कोविड ...

जळगाव : कोरोनावर मात केलेल्या अनेक रुग्णांमध्ये वजन वाढल्याच्या तक्रारी समोर येत असल्याचे चित्र आहे. शासकीय यंत्रणेतील पोस्ट कोविड ओपीडीत असे रुग्ण समोर येत नसले तरी खासगी रुग्णालयात शंभर रुग्णांपैकी तीन ते चार टक्के रुग्ण अशा तक्रारी घेऊन समोर आले आहेत. स्टेरॉइडमुळे ही वजनवाढ होत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात औषध वैद्यकशास्र विभागाच्या अंतर्गत पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली होती. प्राथमिक स्तरावर या विभागात बहुतांश रुग्ण हे थकवा जाणवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे अशा तक्रारी अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यातही ५०पेक्षा वयाचे रुग्ण अधिक येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, सध्या शासकीय यंत्रणेतील पोस्ट कोविड ओपीडीत रुग्णच येत नसल्याची माहिती आहे.

एकूण रुग्ण - ५६,८४६

बरे झालेले रुग्ण - ५५,०६३

वजन वाढलेले रुग्ण - ३ टक्के

पोस्ट कोविड ओपीडीतील रुग्ण - ३५

स्टेरॉइडमुळेही वजनवाढ

रुग्णांना स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले जाते. नियमित याचे सारखे डोस जर दिले गेले तर परिणामी वजन वाढू शकते, कोरोनानंतर वजन वाढल्याचे हे एक कारण असू शकते, मात्र, याने वजन वाढेलच असेही नाही, हे कधी कधी अपवादात्मक स्थितीत होऊ शकते. असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

हेही एक कारण

कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती अत्यंत महत्त्वाची ठरते, अशा स्थितीत रुग्णाला पौष्टिक आहार, फळे, असे खाण्यास सांगितले जाते. सुरुवातीचे पहिले दिवस भूक अत्यंत कमी असते, मात्र, नंतर ती वाढते व भूक वाढल्यानंतर वजन वाढू शकते, असेही तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

- लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणे कमी झाले. व्यायाम कमी झाले. औषधी आणि गोळ्या आणि केवळ आराम ही उपचार पद्धती असल्यानेही त्यामुळेही वजनावर परिणाम होत असतो. त्यातच व्हिटॅमिनच्या गोळ्या यासह विविध औषधींमुळेही वजनवाढ होऊ शकते.

कोट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी दर सोमवारी सुरू असते. मात्र, सद्य:स्थिती असे रुग्ण समोर येत नाहीत. कोरोनानंतर अपवादात्मक स्थितीत वजन वाढू शकते. याला विविध कारणे आहे. स्टेरॉइड हे त्यातील एक असू शकते. शिवाय भूक वाढल्यानंतर वजन वाढू शकते. - डॉ. भाऊराव नाखले, विभागप्रमुख औषधवैद्यक शास्त्र विभाग.