शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य जगायला शिकविते, दु:ख कागदावर मांडल तर मन हलकं होत - साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नवनाथ गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:33 IST

‘फेसाटी’ने आपुलकीची माणसं दिली, चिंतन, वाचन आणि निरीक्षण असले तर तुमचे लिखाण सर्वोत्कृष्ट

आनंद सुरवाडेजळगाव : साहित्य हे जगायला शिकविते, दु:ख हे कागदावर मांडल तर मन हलक होतं, तुम्ही मोकळे होतात़ ‘फेसाटी’मुळे या सर्व गोष्टी अनुभवायला मिळाल्या व आपुलकीची माणसं भेटत गेली, असे सांगत लवकरच आणखी एक उत्कृष्ट कादंबरी घेऊन येणार असल्याची माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’कर नवनाथ गोरे यांनी दिली़ जळगावात आला असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न - फेसाटी कादंबरीने आयुष्य किती बदललं ?नवनाथ गोरे- विद्यार्थी दशेपासून जगण्याची धडपड सुरू होती़ एटीएमवर जॉब केला़ गवंडी काम केले़ उपसमारीचे चटके सहन केले़ आई वडीलांना नेहमी वाटायचे मुलगा शिकावा व सरकारी नोकरी मिळावी, मात्र शिक्षणाचे वातावारण नसल्याने शाळेत कधी चित्त लागले नाही़ पडत-धडपडत बारावी, पदवी घेतली़लिहिण्याची सवय जडली...मात्र, आजुबाजूचं आयुष्य, दुष्काळाचे चटके, ते सहन करून जगणारी माणसं हे सर्व वास्तव अगदी भयावह होतं़ लिहिण्याची सवय जडल्यापासून छोट्या छोट्या कथा लिहित असताना हे वास्तव कागदावर उतरविण्याचे ठरविले व ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने ते कागदावर बोलीभाषेतच मांडले़ एमएच्या द्वितीय वर्षाला असताना २०१३ मध्ये फेसाटी कादंबरी लिहून पूर्ण झाली़ती रणधीर शिंदे यांच्याकडे घेऊन गेलो, प्रकाशकांकडे पाठविली़ मात्र, कोणाचेही उत्तर येत नव्हते़ अखेर २५ आॅगस्ट २०१७ मध्ये साहित्य संस्कृती मंडळाने ती प्रकाशित केली़ या कादंबरीला जवळपास ३० पुरस्कार मिळाले व २२ जून २०१८ रोजी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला़आणि ओळख मिळालीत्यानंतर एक ओळख मिळाली़ आपुलकीची माणसं मिळाली व आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले व लिहिण्याची एक उमेद, एक नवा आत्मविश्वास मिळाला़वाचनापासून लोक दूर जात आहेत का?अस वाटतं नाही़ तुम्ही वाचकांच्या हाती काही उत्कृष्ट दिलं तर ते वाचतातच, लेखक बनायचं असेल तर आधी वाचक व्हावे लागते. तुमच लिखाण हे कुणाच्या प्रभावाखाली नको व बनावटी नको, वास्तव, प्रामाणिकपणा हा असला तर ते वाचायला भरपूर वाचक आहेत़ माध्यमं बदलली आहेत, वाचन संस्कृतीला चांगले दिवस आहेत़ नव लेखकांनी महाविद्यालयाच्या व्यासपीठाचा आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी पुरेपूर उपयोग करावा, गाव, शहर हा भेद राहिलेला नाही़ लिहितांना दूरदृष्टी, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीकोनातून कुठल्याही घटनेला प्रसंग पाहण्याचा दृष्टीकोन हवा. चिंतन, निरीक्षण, वाचन असलं तर तुमचं लिखाण उत्कृष्ट होतचं.पुरस्कार मिळाल्यानंतर लिखाणात काय बदल हवा ?पुरस्काराची कल्पना नव्हती़ जे होतं ते बोलीभाषेत मांडले, ते वाचकांनी स्वीकारले. मात्र, एखादी चांगली कलाकृती समोर ठेवल्यानंतर सहाजिकच तुमच्याकडून अपेक्षा वाढतात व तुमची जबादारीही. फेसाटीनंतर एक मॅच्युरिटी आली़ मात्र, फेसाटीनंतर खरे विषय सुरू झाले आहेत़ फेसाटी लिहून संपलेले नाही, मी जोपर्यंत आहे, तो पर्यंत प्रश्न संपणार नाही, रोज काहीना काही घडत असते. त्यामुळे लिहीत राहणार, विचार मांडत राहणाऱ एका चित्रपटाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर काम होणार आहे़संवेदनशील व एकटं राहण्याचा स्वभाव असल्याने गावात तेवढी ओळख नव्हती, मात्र ह्यफेसाटीह्णने आज ओळख दिली़ यामुळे आपुलकीची माणसं मिळाली़ आई-वडीलांच्या, आपल्या माणसांच्या चेहºयावर हसू फूलवू शकलो, हे फेसाटीने दिलेले सर्वात मोठे पारितोषिक आहे़- नवनाथ गोरे 

टॅग्स :Jalgaonजळगाव