शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:59 IST

होळनांथेतील घटना : दोन सराफा दुकानांंमधून ४५ ग्रॅम सोने, ९ किलो चांदीचे दागिने चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कहोळनांथे : येथील मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकाने फोडून चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. मात्र सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. दोन्ही दुकानांमध्ये मिळून ४५ ग्रॅम सोने व ९ कि.ग्रॅ.चांदी असा एकूण ऐवज चोरीला गेला आहे. श्वानाने बसस्थानकापर्यंत माग दाखविला. फिंगरप्रिंट तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. गावातील मुख्य बाजारपेठेत किरण नरेंद्र सोनार यांचे श्रीकृष्ण ज्वेलर्स व बाळकृष्ण महादू भालेराव यांचे भालेराव ज्वेलर्स ही दुकाने आहेत. चोरट्यांनी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दोन्ही दुकानांच्या शटर पट्टी कापून आत प्रवेश केला. किरण सोनार यांच्या दुकानातून २५ ग्रॅम सोने व ५ कि.ग्रॅ. चांदी तर बाळकृष्ण सोनार यांच्या दुकानातून २० ग्रॅम सोने व ४ कि.ग्रॅ.चांदी असे दोघे मिळून साडेपाच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सकाळी साडेआठ वाजता दोन्ही दुकानदार दुकाने उघडण्यास आले असता हा प्रकार लक्षात आला. तुषार सोनार यांनी थाळनेर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाघ, कर्मचारी कृष्णा पावरा, शिराज खाटीक, नरेश मंगळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी शटरपट्ट्या कापण्यासाठी कटरचा वापर केल्याचे दिसून आले. दागिन्यांचे ट्रे पाटचारीत फेकलेचोरट्यांच्या तपासासाठी श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने बस स्थानकापर्यंत दाखविला. फिंगरप्रिंट तज्ञांनाही बोलविण्यात आले होते. चोरट्यांनी दुकानातील कपाटामधून दागिन्यांचे ट्रे गायब केले. दागिने काढून रिकामे ट्रे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी बभळाज रस्त्यावरील पाटचारीच्या पाण्यात फेकलेले आढळले. येथील बांधकाम व्यावसायिकाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सफेद वाहनातून रात्री २.२६ वाजता येताना तर २.४० वाजता जाताना दिसत आहेत. श्वानाने दाखविलेल्या मागनुसार चोरट्यांनी पाटाजवळ थांबून दागिने काढले व ट्रे पाण्यात फेकून बभळाज रस्त्याने पसार झाल्याचा कयास आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :Dhuleधुळे