मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’ घेऊन बिबट्याची ‘घरवापसी’; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनक्षेत्रात रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:49 IST2026-04-15T13:48:55+5:302026-04-15T13:49:30+5:30

बिबट्याला कुठेही इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तज्ज्ञांच्या सूचनेनुसार बिबट्याला आहार पुरविण्यात आला. त्यानंतर बिबट्याची पचनशक्ती सशक्त असल्याचे स्पष्ट होताच बिबट्याला सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे.

Leopard returns home after receiving hospitality from Muktai Nagar Leaves for forest area after advice from medical experts | मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’ घेऊन बिबट्याची ‘घरवापसी’; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनक्षेत्रात रवाना

मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’ घेऊन बिबट्याची ‘घरवापसी’; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनक्षेत्रात रवाना


जळगाव : मुक्ताईनगर येथे रविवारी मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला मोठ्या कसरतीनंतर ताब्यात घेतल्यानंतर त्याला ४८ तास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.  या ४८ तासात बिबट्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. बिबट्याला कुठेही इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तज्ज्ञांच्या सूचनेनुसार बिबट्याला आहार पुरविण्यात आला. त्यानंतर बिबट्याची पचनशक्ती सशक्त असल्याचे स्पष्ट होताच बिबट्याला सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे.

रविवारी सकाळी मुक्ताईनगरच्या शासकीय विश्रामगृह परिसरात अचानक बिबट्याचा वावर दिसून आला होता.  त्यानंतर वनविभागाने ‘डॉट’च्या माध्यमातून भूल दिली होती. काहीसा नरमलेला आणि सुस्तावलेला बिबट्यावर काही ग्रामस्थांनी हल्ला चढवत त्याला जेरबंद केले होते. जेरबंद केलेल्या बिबट्याला वनविभागाने एका विलगीकरण कक्षात निवारा उपलब्ध करुन दिला. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या बिबट्याच्या प्रकृतीवर लक्ष केंद्रीत केले. बिबट्याला कुठेही दुखापत झाली नसल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे ४८ तास निगराणीखाली ठेवत बिबट्याला वनक्षेत्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

भरपेट मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ४८ तासांच्या कालावधीत पचनक्रियेवर काही परिणाम झाला आहे का, याच्या निदानासाठी बिबट्याला आहार पुरविण्यात आला. मुक्ताईनगरच्या आहारावर ताव मारल्यानंतर बिबट्याची पचनशक्ती सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र बिबट्याला पुरेशा प्रमाणात आहात देण्यात आला. मंगळवारी सायंकाळी बिबट्याला वनविभागाच्या पथकाने पुन्हा ताब्यात घेतले आणि एका वाहनाद्वारे सातपुडा वनक्षेत्रात नेले.

‘सुसाट’ पळाला जंगलात
वनविभागाने बिबट्याला पिंजऱ्यात बंद केले आणि हा पिंजरा एका वाहनाद्वारे सातपुडा वनक्षेत्रात नेण्यात आला. वनक्षेत्रात वाहन उभे केल्यानंतर हळूवारपणे पिंजरा उघडण्यात आला. डोळ्यासमोर वनक्षेत्र दिसल्यानंतर बिबट्याने सुरुवातीला पिंजऱ्यामागच्या भागात वावर केला. त्यानंतर पिंजऱ्याच्या दाराशी आल्यानंतर चौफेर नजर भिरकावली आणि एकांत असल्याची जाणीव झाल्यानंतर बिबट्या मोठ्या ऐटीत वाहनाखाली उतरला आणि मोबाईल टॉवरच्या ओट्यावर चढून तो क्षणातच पसार झाला.

Web Title : मुक्ताईनगर में तेंदुए की 'मेहमान नवाजी', जांच के बाद घर वापसी

Web Summary : मुक्ताईनगर में पकड़े गए तेंदुए को 48 घंटे तक पशु चिकित्सा देखभाल मिली। बिना नुकसान और अच्छे पाचन के पाए जाने पर, इसे सतपुड़ा जंगल में छोड़ दिया गया।

Web Title : Leopard's 'Hospitality' in Muktainagar, Returns Home After Checkup

Web Summary : A leopard, captured in Muktainagar, received veterinary care for 48 hours. Found unharmed and with good digestion, it was released into the Satpura forest.