लाॅकडाऊननंतर प्रथमच वरखेडी येथील गुरांचा बाजार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 09:44 PM2021-06-10T21:44:01+5:302021-06-10T21:44:01+5:30

लॉकडाऊननंतर प्रथमच वरखेडी येथे गुरुवारी गुरांचा बाजार सुरू करण्यात आला.

Later, for the first time, a cattle market was started at Varkhedi | लाॅकडाऊननंतर प्रथमच वरखेडी येथील गुरांचा बाजार सुरू

लाॅकडाऊननंतर प्रथमच वरखेडी येथील गुरांचा बाजार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देपाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीला १६ हजार ८८५ रुपयांचा कर

लोकमत न्यूज नेटवर्क

वरखेडी, ता. पाचोरा : लॉकडाऊननंतर गुरुवारी येथील गुरांचा बाजार सुरू करण्यात आला. यावेळी गुरांच्या बाजारावर फार मोठा फरक पडलेला दिसून आला. गुरांची आवक फारच कमी होती. सकाळी प्रशासक अभय पाटील व सचिव बी. बी. बोरुडे यांची उपस्थिती होती. वरखेडी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रशासक व सचिव यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

धनराज विसपुते, उपसरपंच धनराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगेश चौधरी, राकेश पाटील, विजय भोई, संजय पाटील, चंद्रकांत सोनवणे हे ग्रामपंचायत पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज गुरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीला १६ हजार ८८५ रुपयांचा कर व प्रवेश फीच्या माध्यमातून उत्पन्न मिळाले.

शेतीच्या हंगामासाठी बैलजोडी खरेदी-विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी हा बाजार सुरू होणे म्हणजे एक आनंदाची बातमी आहे. यामुळे व्यापारी तथा शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. आजच्या बाजारात जवळजवळ ३५ ते ४० म्हशी, १५० बैल आणि ३५० शेळ्यांची आवक होती.

Web Title: Later, for the first time, a cattle market was started at Varkhedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.