शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

५७ पक्के अतिक्रमीत बांधकाम केले जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:16 IST

जळगाव : शहरातील शाहूनगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारींवर अतिक्रमण केलेल्या ५७ पक्कया बांधकामावर मनपाकडून जेसीबी चालविण्यात आला. या ...

जळगाव : शहरातील शाहूनगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारींवर अतिक्रमण केलेल्या ५७ पक्कया बांधकामावर मनपाकडून जेसीबी चालविण्यात आला. या भागातील रस्त्यालगतच्या गटारींवर सुमारे १५० हून नागरिकांनी शौचालय, ओट्यांचे बांधकाम करून ठेवले आहे. याबाबत मनपाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी तगड्या पोलीस बंदोबस्तात मनपाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी मनपा कर्मचारी व रहिवाश्यांमध्ये किरकोळ वाद देखील झाले.शाहूनगर येथील पोलिस चौकी ते ट्रॅफीक गार्डन रस्त्यालगत गेल्या पंधरा वर्षांपासून हे अतिक्रमण कायम असल्याने रस्त्यावरून ये-जा करताना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी व रस्ता अरुंद झाला होता. अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांच्या नेतृत्वाखाली जोरदार कारवाई करण्यात आली.उपायुक्तांनी केली पाहणीमनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास अतिक्रमण कारवाईचा आढावा घेतला. त्यानंतर शाहू नगर भागात जावून अतिक्रमणाची पाहणी देखील केली. दरम्यान, कारवाईदरम्यान काही रहिवाश्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी वाद घातला. आधी रस्त्यांची दुरुस्ती करा त्यानंतर अतिक्रमण काढा असा संताप स्थानिक नागरिकांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला. मनपाने अतिक्रमण निर्मूलन कारवाईसाठी वाद उदभवू नये म्हणून तगडा पोलिस बंदोबस्त घेतला होता. त्यानुसार १ पोलिस अधिकारी, पाच पुरुष पोलिस कर्मचारी, पाच महिला पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त कारवाई प्रसंगी होता. बुधवारी देखील या भागात कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती एच.एम.खान यांनी दिली.गटारींवर बांधकाम करून रस्त्यावर केले होते अतिक्रमणया भागात गटारीवर नागरिकांनी थेट शौचालय, ओटे, जिन्यांचे पक्के बांधकाम केल्याचे पहायला मिळाले. काही जणांनी तर गटारींच्या पुढे असलेल्या रस्त्यावरही तीन ते चार फुटांचे अतिक्रमण केल्याचे आढळून आले. गटारींवर अतिक्रमण केल्यामुळे गटार देखील काढता येत नाही. पावसाळ्यात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. दुर्गंधीमुळे आजारांचेही प्रमाण वाढत असते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव