शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

किडनीदान करीत भावजयीला दिले जीवदान

By admin | Updated: June 19, 2017 16:13 IST

समाजापुढे ठेवला आदर्श : नशिराबाद येथे बहिणीने सावरला भावाचा संसार

ऑनलाईन लोकमत

नशिराबाद, दि.19 - येथील प्रगतीशील शेतकरी किसन भंगाळे यांची मुलगी अलका चौधरी यांनी त्यांच्या भावजयी आशा भंगाळे  यांना आपली किडनीदान देऊन जीवदान दिले आहे. बहिणीच्या दातृत्वामुळे भावाचा संसार सावरला आहे.
नणंद-भावजयीच्या नाजूक नात्यातील मतभेद सर्वश्रुत आहे. मात्र यास अपवाद ठरवित दोघींनी नात्यात ठेवलेला स्नेह समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. नणंदेने भावजयीला दीर्घ आयुष्याची भेट दिली असून भावाचा संसार नव्याने फुलविला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आशा भंगाळे व अलका चौधरी यांची प्रकृती चांगली आहे. नणंदने भावजयीसाठी केलेल्या कार्याबद्दल नशिराबाद येथे कौतुक केले जात आहे.
मूळचे नशिराबाद येथील रहिवासी व सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले विठ्ठल किसन भंगाळे यांच्या प}ी आशा भंगाळे (49) यांना 2002 मध्ये किडनीवर सूज असल्याचे निदानानंतर औषधोपचार सुरू होते. दिवसेंदिवस आजार वाढत गेला. दोन्ही किडनी जानेवारी 2017 मध्ये पूर्णपणे निकामी झाल्याचे कळाल्यानंतर कुटुंब हवालदिल झाले होते. 
भावाची धडपड व भावजयीच्या वेदना पाहून अस्वस्थ न होता धीर देत नशिराबाद येथील विठ्ठल भंगाळे यांची बहीण अलका चौधरी यांनी किडनी देण्याची इच्छा प्रकट केली. अलकाचा मुलगा तुषार व शालिक  दोन मुले वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत आहे. त्यांनीही मामीला किडनीदानास अनुमती दिली. त्यामुळे सर्वाचाच आनंद गगनात मावेना. कायदेशीर बाबी व आवश्यक चाचण्या पूर्ण करुन  औरंगाबाद  येथे किडनी प्रत्यारोपण झाले. शस्त्रक्रिया  यशस्वी झाल्याने कुटुंबात आनंद व्यक्त होत आहे. त्यानंतर नणंद-भावजयींचे आनंदाश्रू वाहू लागले.  दोघींची प्रकृती चांगली असल्याची माहिती तुषार चौधरी व विठ्ठल भंगाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली. 
(वार्ताहर)