लघुशंकेला गेलेल्या जळगावातील व्यावसायिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:44 IST2019-08-24T12:43:29+5:302019-08-24T12:44:26+5:30

अकस्मात मृत्यू

Jalgaon businessman dies after falling short | लघुशंकेला गेलेल्या जळगावातील व्यावसायिकाचा मृत्यू

लघुशंकेला गेलेल्या जळगावातील व्यावसायिकाचा मृत्यू

जळगाव : रात्री जागा आल्यावर लघुशंकेला गेलेल्या व्यावसायिकाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री ११़३० वाजता उघडकीस आली़ अभिजित मनोहर पिले (४९, महाबळ कॉलनी) असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे़
अभिजित हे गुरूवारी रात्री ११़३० वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठले. ते बाथरूमध्ये गेले़ दरम्यान, त्यावेळी अचानक खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला़ खूप वेळ झाला, परंतु वडील अजून आले नाही म्हणून मुलगा अक्षय याने बाथरूमचा दरवाजा ठोठावला़ मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रकार कुटूंबीयांना सांगितला़ दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना अभिजित यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले़ त्यांना रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले़ त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Jalgaon businessman dies after falling short

टॅग्स :Jalgaonजळगाव